तहसील कार्यालयाचा जागेचा शोध थांबला
रावेतमध्ये जागा प्रस्तावित; तहसीलदारांची माहिती
पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु, दिव्यांग व्यक्तींना आणि अशिक्षित नागरिकांना कोणते दाखले कसे मिळतात, हेच माहिती नसल्याने थेट नागरिकांनाच विनंत्या करून कामे करून घ्यावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दिव्यांगांनाही दोन-दोन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते आहे.
पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध प्रकारचे दाखले मिळतात. यामध्ये उत्पन्न दाखला, रहिवासी, जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, असे वेगवेगळे दाखले मिळतात. शाळा, महाविद्यालये सुरू होण्यास काही दिवस बाकी असल्याने विविध दाखले मिळवण्याकरिता पालकांची आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. निगडी येथील अप्पर तहसील कार्यालयात अपेक्षित दाखल्यांसाठी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होत आहे. सेतू सुविधा केंद्रात दाखले मिळण्यासाठी ठराविक कालावधी निर्धारित केलेला आहे. तरीही त्या ठराविक कालावधीत ते मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत
कोट
‘‘आता नव्यानेच कार्यालय या ठिकाणी आले आहे. सर्व विभाग तळमजल्यावर आहेत. मात्र, तहसीलदार कार्यालय तसेच इतर काही विभाग पहिल्या मजल्यावर असल्याने नागरिकांना तसेच दिव्यांगांना त्रास होत आहे. तहसील कार्यालयासाठी रावेत येथे जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.’’
– अर्चना निकम, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.