पिंपरी, ता. १६ ः ‘‘महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकातच ‘अनुभवमंटप’च्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी स्वत:पासून सुरवात केली,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महापालिका आणि महात्मा बसवेश्वर समिती यांच्यातर्फे निगडीत महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारला आहे. त्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पुतळा समितीचे नारायण बहिरवडे, महापालिका प्रशासक शेखर सिंह आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘बसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली. स्त्री-पुरुष, धर्म-पंथ, जात-पात आदी भेदांच्या पलिकडे जाऊन कोणीही ‘अनुभवमंटप’मध्ये आपले अनुभव मांडू शकत होते. श्रम हीच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था इतके साधे सोपे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले आहे. देवाशी अर्थात शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली. त्यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो.’’
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. त्यांचा त्याग, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण मोठे काम केले आहे. यापुढेही पुतळा परिसर सुशोभिकरण संबंधित आवश्यक कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या परिसरातील दफन भूमीचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
असा आहे पुतळा
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या निगडीतील पुतळ्याचे क्षेत्र सुमारे तीन हजार १५० चौरस मीटर आहे. समोरील जागेचे सुशोभीकरण केले आहे. पुतळ्याभोवती २२५ मीटर लांबीची सीमाभिंत आहे.
--
फोटोः 49839
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.