१) नवल
‘नवल’ या दिवाळी अंकाचे हे एकाहत्तरावे वर्ष आहे. गूढकथा, कूटकथा, मानववंशशास्त्रीय कथा, भयकथा, अद्भूतकथा, विज्ञानकथा आदी विभाग करून कथा व लेखांची मांडणी करण्यात आली आहे.
‘गूढ रहस्यमय बेटांवरची अदभुत सफर’ असा या अंकाचा गाभा आहे. सर्वोत्तम सताळकर, सागर कुलकर्णी, मिलिंद नरहर जोशी, अरुण वर्टी, सुनेत्रा मराठे आदींच्या गूढकथांनी अंक सजला आहे. चंदर भागवत, श्रीनिवास शारंगपाणी, संजय काळे, महेश सोवनी, अजय जयवंत, कल्पिता राजोपाध्ये, अनुपमा भेदी, सोनाली करमरकर आदींच्या कुटकथा आहेत. सुरेश भावे यांची मानववंशशास्त्रीय कथा आहे. आराधना कुलकर्णी, विद्या बालवडकर, रवींद्र भागवत यांच्या भयकथा आहेत. निखिलेश चित्रे, रमा गोळवलकर, ऊर्जिता कुलकर्णी, संजीव कुलकर्णी आदींनी अद्भूत जगाची सफर घडवली आहे.
चंद्रमोहन कुलकर्णी व सतीश भावसार यांची चित्रे अंकाच्या विषयाला साजेशी आहेत.
संपादक : अभिराम अंतरकर, पाने : २८०, किंमत : ४०० रुपये
-----------------
२) शब्दाई पत्रिका
नामवंत लेखकांनी विविध विषयांवर लिहिलेले लेख अंकाचे वैशिष्ट्ये आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांनी ‘लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या संदर्भात लिहिलेला ‘नागनाथ कोत्तापल्ले : सर्वंकष सत्याचा शोध घेणारा लेखक’ , प्रा. प्रवीण दवणे यांनी ‘शब्द : अर्थाचे आकाश सावरणारे’, प्रा. विश्वास वसेकर यांनी ‘ग्रेस म्हणजे ग्रेसच होते’ तसेच अनिल गुंजाळ यांनी लिहिलेली देवदूत, सतीश सोळांकूरकर यांनी धगधगत्या वास्तवाची काहिली.. एक भाकर तीन चुली आणि अशोक नकाते यांनी लिहिलेल्या ऋणानुबंध, प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. जवाहर मुथा आदी लेखकांचे लेख वाचनीय आहेत. तसेच लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. ऐश्वर्या पाटेकर, नलिनी भोसेकर, प्रा. बी. एन. चौधरी व संजय ऐलवाड यांनी लिहलेल्या कथा आणि प्रा. अशोक बागवे, रमण रणदिवे, आसावरी काकडे, प्रा. वा. ना आंधळे, ज्योत्स्ना चांदगुडे, राजन लाखे, अशोक सोनवणे, अंजली ढमाळ आदी कवींच्या कविता भावणाऱ्या आहेत.
संपादक : स्वाती पिंगळे, पाने : २०८, किंमत : ३०० रुपये
फोटोः ६३३८७
--------
३) शुभम
विविध विषयांवर लेख, कथा, विनोदी कथा, प्रवास वर्णन आणि लहान मुलांसाठी खुसखुशीत असा भरगच्च मजकूर शुभम या दिवाळी अंकात वाचायला मिळेल. यामध्ये पी. एम. मनोहर यांनी ‘साईबाबांचे भक्तकल्याणकारी रुद्रावतार’ डॉ. वि. ल. धारूरक यांनी ‘योगिया पाहे दिवाळी निरंतर’ धनंजय सोलंकर, गुरुप्रसाद पणतदुरकर, संजयकुमार चौधरी, डॉ. प्रकाश जाधव यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. तसेच उद्धव भयवाळ यांनी लिहिलेली ‘पानगळ’ यांच्यासह विशाल मोहोड यांनी एक रुपया, उदय जोशी यांनी सनाथाश्रम, अरविंद खडमकर यांनी ‘सेतू’ तसेच राजेंद्र वैद्य, आनंद देशमुख आणि सोनाली करमरकर यांनी लिहिलेल्या कथा वेगळा अनुभव देऊन जातात. सचिन बेंडभर, उत्तम सदाकाळ, अशोक लोटणकर, प्रमोद रोहणकार, विजय महादर यांच्या विनोदी कथा मनोरंजनात्मक आहेत. तसेच प्रवास वर्णन, हास्य क्लब, वात्रटिका, व्यंगचित्रे, पाककृती, वार्षिक राशी भविष्य यांच्यासह लहान मुलांसाठीच्या विविध कविता आणि कविता अंकात आहेत.
संपादक : मनीषा फाटे, पाने १८०, किंमत ः ३०० रुपये
फोटोः ६३३८९
--------
४) धनश्री
धनश्री अंकात डॉ. शीतल मालसुरे यांनी लिहिलेला ‘थांब सूनबाई ओटी भरून जा’, माधुरी विधाटे यांनी ‘वारसा’ विशाखा पवार यांनी ‘मी माझ्या प्रेमाच्या जगात’ हे लेख मनाला भावणारे आहेत. गुरुप्रसाद पणदूरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अर्थकारण या विषयावर भाष्य करणारा लेख लिहिला आहे. ‘कुठे चाललाय समाज’ या विषयावर अनुराधा हवलदार यांनी लेखन केले आहे. ललित सबनीस यांचा ‘कौटुंबिक ताणतणाव आणि उपाय’ या विषयाचा लेख वाचनीय आहे. कविता, वार्षिक राशिभविष्य आणि शब्दकोडे अंकात आहे.
संपादक : शिवाजी घोडे, पाने :१४४, किंमत १९९ रुपये
फोटोः ६३३८८
–--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.