पिंपरी-चिंचवड

पिंपरी सोमवारी प्रचार सांगता

CD

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

विधानसभा निवडणूक; रविवारच्या सुट्टीत पदयात्रा, वाहनफेरी, भेटीगाठींवर भर

पिंपरी, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. त्याचा प्रचार सोमवारी (ता. १८) सायंकाळी संपणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, त्यापूर्वी रविवारच्या सुट्टीची संधी साधत जवळपास सर्वच उमेदवारांनी पदयात्रा काढून, वाहन फेरी काढून, काही ठिकाणी कोपरा सभा घेऊन तर, भारतीय जनता पक्ष महायुतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भोसरीत सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अन्य उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघ आहेत. तीनही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत आहे. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. शहरातील ताथवडे गावाचा समावेश मात्र भोर-वेल्हे-मुळशी मतदारसंघात होतो. लगतच्या मावळ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे. सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अन्य राज्यस्तरीय पक्ष व अपक्षांनीही मतदारांच्या भेटीगाठींवर रविवारी भर दिला. त्यामुळे शहरातील वातावरण प्रचाराची धामधूम रविवारी बघायला मिळाली.

आजपर्यंतच्या सभा, रॅली
चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार मनोज तिवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह कर्नाटक व राजस्थानातील आमदारांच्या सभा, बैठकी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार जयंत पाटील, रोहित पवार यांच्या सभा झाल्या आहेत. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन यांची पदयात्रा, डॉ. कोल्हे व रोहित पवार यांची बाईक रॅली झाली आहे.

निवडणुकीतील पक्ष
भारतीय जनता पक्ष- शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय-आठवले) व मित्र पक्षांची महायुती आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षांची महाविकास आघाडी यांचे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष, विदुथलाई चिरुथाईगलकाची, स्वराज्य शक्ती सेना, स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, ऑल इंडि. मजलिस- ए- इन्कलाब- ए- मिल्लत या पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मतदारसंघनिहाय
पक्ष, अपक्ष उमेदवार
मतदारसंघ / पक्षांचे उमेदवार / अपक्ष उमेदवार
चिंचवड / २१ / १४
पिंपरी / १५ / ८
भोसरी / ११ / ६
एकूण / ४७ / २८
(मावळ विधानसभा मतदारसंघात पक्षांचे दोन आणि अपक्ष चार असे सहा उमेदवार आहेत.)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT