पिंपरी-चिंचवड

मतदारांसाठी ‘नोऽ यूवर पोलिंग स्टेशन’

CD

पिंपरी, ता. १९ ः चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांत ‘नोऽ यूवर पोलिंग स्टेशन’ (तुमच्या मतदान केंद्राची माहिती) सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत दोन हजार ३१८ नागरिकांनी सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी (ता. २०) मतदान आहे. त्यानिमित्त शहरातील सर्व मतदान केंद्रांवर महापालिकेने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत ‘नोऽ यूवर पोलिंग स्टेशन’ कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी या कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.

हेल्पलाइन
मतदान केंद्र, बदललेले मतदान केंद्र, नावातील बदल यांसाठी मतदारांनी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइन क्रमांक ८८८८००६६६६ किंवा ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधावा.

मतदारांना आवाहन
- मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर (EPIC NO ः Electors Photo Indentification Card) समक्ष अथवा दूरध्वनी वरून सांगितल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मतदार यादीत संबंधित मतदाराचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, हे शोधणे सुलभ जाईल. त्यासाठी मतदारांनी त्यांचा निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर सांगून आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर होणार आहे हे समजून घ्यावे.
- मतदार ओळखपत्र अथवा त्यावरील इपिक नंबर उपलब्ध होत नसल्यास संबंधित कर्मचाऱ्याला स्वतःचे वा कुटुंबातील सदस्यांचे नाव, वय, जन्म तारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन मतदान केंद्र शोधता येईल.
- मतदाराच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये झालेली असल्यास मतदाराला आपले नाव मोबाईलवर ओटीपीद्वारे शोधणे सहज शक्य होणार आहे.

‘‘महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांनी मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘नोऽ यूवर पोलिंग स्टेशन’ची मदत घ्यावी. मतदार ओळखपत्रावरील नंबर वरून मतदार केंद्र शोधणे अधिक सुलभ व सोपे आहे. यासाठी मतदारांनी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांना सारथी हेल्पलाइन क्रमांक ८८८८००६६६६, ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधावा अथवा समक्ष जाऊन इपिक नंबरचा वापर केल्यास मतदान केंद्र शोधता येईल. शहरातील सर्व नागरिकांनी आपला मताचा अधिकार बजावावा.’’
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT