देहू, ता. १९ ः मावळ विधानसभा मतदान संघात उद्या बुधवारी (ता.२०) होणाऱ्या मतदानासाठी देहूमधील वीस मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. देहू नगरपंचायतीच्या हद्दीत २१ हजार ७६८ मतदार आहेत. त्यातील बहुतांश मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
याबाबत देहूचे निवडणूक विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सुरेंद्र आंधळे म्हणाले की,‘‘देहू, माळवाडी आणि विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत २० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यातील देहूत सात मतदान केंद्रे आहेत; तर विठ्ठलवाडी येथे नऊ मतदान केंद्रे आहेत. माळवाडी येथे चार मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रावर साधारणपणे बाराशे ते चौदाशे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक शाळेत मंडप उभारण्यात आला असून मतदारांना माहिती देण्यासाठी एका ‘बीएलओ’ची नियुक्ती करण्यात आली आहे. गाव कामगार तलाठी एस.एल.काळे, सोमनाथ मुसुडगे यावेळी उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी देहूरोड पोलिस ठाण्याच्यावतीने मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
DUH24B00705
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.