पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

चिखलीत दोन वाहने पेटवली
पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी हॉटेल व्यावसायिकाच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. त्यानंतर दोन वाहने पेटवून दिली. तसेच इतरही वाहनांची तोडफोड करत नुकसान केले. चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडई चौक येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक मगन देवासी (रा. स्पाईन रोड, कृष्णानगर भाजी मंडई चौक, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्याकडे त्यांनी दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. ‘तू आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही का ? तुला दाखवतो’, अशी धमकी देत त्यांनी फिर्यादी यांच्या चुलत भावाच्या दुचाकीसह दोन दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. तसेच दोन मोटारींसह इतरही वाहनांची तोडफोड केली.


एटीएम कार्डधारकाची फसवणूक
पिंपरी : गोपनीय पिन पाहून एटीएम कार्डद्वारे ८१ हजार ८५० रुपये काढून घेत एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना देहूरोडमधील विकासनगर येथे घडली. या प्रकरणी बाबासाहेब विनायक जगदाळे (रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी विकासनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले. दरम्यान, त्यांचे लक्ष विचलित करून अनोळखी व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक पाहिला. त्यानंतर, त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून ८१ हजार ८५० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी : बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पिंपरीतील भाटनगर येथे करण्यात आली. आरोपी महिलेने बेकायदा दारू विक्री करण्यासाठी दारू साठा बाळगला. याबाबत पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेकडून १३ हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT