पिंपरी-चिंचवड

पोलिसांच्या नियोजनामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत

CD

पिंपरी, ता. २४ : विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान व निकालानंतरही आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतता कायम राहिली.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासूनच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला. नाकाबंदी, पथ संचलन, शस्त्र जमा करणे यासह कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. यासह सर्व हालचालींवर बारीक लक्ष होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार हद्दीसह पोलिस ठाण्यांना भेट दिली जात होती. सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात होता.
तसेच एक पोलिस सहआयुक्त, एक अप्पर आयुक्त, सहा उपायुक्त, नऊ सहायक आयुक्त, ३११ निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ३ हजार ९५ अंमलदार, १ हजार होमगार्ड, सीमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रत्येकी २ कंपन्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, हरियाना पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे वेळोवेळी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व परिस्थितीचा तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत होते.
दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल पोलिस आयुक्तांनीही सर्वांचे आभार मानले.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT