पिंपरी-चिंचवड

हसत हसत जगणे हेच जीवन ज्येष्ठ कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा सल्ला; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवात सेवा

CD

पिंपरी, ता. २४ ः ‘‘अनेक माणसं विनाकारण तणावात राहतात. त्यातून ह्रदयविकाराच्या झटक्याने अनेक जण जातात. पण, ह्रदयविकार हा रोग नाही. तो मानसिक तणाव आहे. तो घालवण्यासाठी झालेली घटना जागेवर विसरायला हवे आणि नामस्मरण करायला हवे. अध्यात्म साधायला हवे. हसत हसत जगणे हेच जीवन आहे,’’ असा मौलिक सल्ला ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी दिला.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात आळंदीतील कार्तिकी वारी आणि पिंपरी-चिंचवड ‘सकाळ’चा वर्धापनदिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात ज्येष्ठ कीर्तनकार इंदोरीकर महाराज बोलत होते. त्यांच्या हस्ते वीणा आणि भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा पूजन व दीपप्रज्वलन झाले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुखमाई, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे पूजनही त्यांच्या हस्ते झाले. दैनंदिन जीवनातील दाखले देत त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या,
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥
तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट नलगती ॥
अजपाजपणें उलट प्राणाचा ।
तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥
या हरिपाठातील अभंगाचे निरूपण केले. ते म्हणाले, ‘‘कोणाचाही आधार नसताना संत झालेले बाळ म्हणजे ज्ञानोबा माऊली आहेत. त्यांनी लिहिलेला हरिपाठ हा ग्रंथ नाही तर वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही विश्वाची आई आहे. हरिपाठामध्ये ‘हरि’ शब्द १०८ वेळा आला आहे. म्हणून तुळशीच्या माळेत १०८ मणी आहेत. त्यांचा जप करत नामस्मरण केल्याने मनावरचा तणाव कमी होतो. एक वेळ हरिपाठ पाठ करा. जगात कुठलेही वेगळे ज्ञान घेण्याची गरज नाही, सर्व जीवनाचे तत्वज्ञान त्यात सांगितले आहे.’’
परमार्थ हा प्रेमावर आधारित आहे. त्यासाठी मन, ह्रदय व बुद्धी कोमल असावी लागते. या तीन गोष्टी माणसाजवळ नसतात. पण, त्या असल्याचे तो भासवत असतो. या तिन्ही गोष्टी फक्त संतांजवळ असतात, असे सांगून इंदोरीकर महाराज म्हणाले, ‘‘मन दुसऱ्याचे वाईट चिंतन करते. माणसं ही पाषाण ह्रदयी असतात. बुद्धी मनाला भ्रष्ट करते.’’ जीवनात परमार्थ साधण्यासाठी मन, बुद्धी आणि ह्रदय कोमल असायला हवे. संपत्ती व दया एकत्र कधी येत नाहीत. आणि ते एकत्र आलेच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहात नाही. देव ज्याला व्हायचे आहे, त्याने संपत्ती व दया यांना एकत्र आणायला हवे. माणसासाठी उत्तम शरीर ही त्याची उत्तम संपत्ती आहे आणि मनाची मनापासून प्रसन्नता हाच स्वर्ग आहे. पण, जगात पैसा व स्वार्थ यावरच प्रेम करणारे अधिक आहेत, अशी खंतही इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केली.


इंदोरीकर महाराज यांचा कानमंत्र
- मन निर्मळ करणारे प्रभावी औषध म्हणजे अध्यात्म
- जगातील प्रभावी शस्त्र क्षमा असून, ती मागणे हे विद्वानाचे लक्षण
- मी, तू, तुझं, माझं, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि माया यांपासून दूर रहा
- चारित्र्य संपन्न मुलाचे वडील होण्याचे ध्येय ठेवा
- घरांमध्ये मानसिक संतुलन राखण्यासाठी अध्यात्म जपा
- वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव असून, कळस तुकोबाराय आहेत

वारकरी संप्रदायाचा ‘सकाळ’ला आशीर्वाद
वारकरी संप्रदायाला डोक्यावर घेणारे वृत्तपत्र म्हणजे ‘सकाळ’ आहे. वारकरी संप्रदायासाठी वाहून घेतलेले वृत्तपत्र म्हणजे ‘सकाळ’ आहे. आणि ‘सकाळ’ला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. या वारकरी संप्रदायाची उंची जगात ‘सकाळ’ने मोजली आणि तळागाळापर्यंत नेली आहे, त्यासाठी ‘सकाळ’ला खूप खूप शुभेच्छा! देत ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.

पिंपळे गुरवला आज माने-परांजपे यांचे कीर्तन
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात सोमवारी (ता. २४) दुपारी ४.३० वाजता कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे यांचे कीर्तन होईल. पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात कीर्तन होईल. या कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी प्रवेश शुल्क नाही. मात्र, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः प्रशांत ः ८३८००७४८२३
---
फोटो ओळ
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात अभंग निरूपण करताना निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर.
---
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात उपस्थित भाविक.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT