पिंपरी-चिंचवड

आधुनिकतेला साजेसा सर्वांगीण विकासाचा ध्यास

CD

इंट्रो ः वाकडगाव ते विकसित उपनगर अशी ओळख असलेल्या वाकड परिसराची पिंपरी-चिंचवड शहरासोबतच जगाच्या नकाशावर ठळकपणे दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी हब’ वाकडपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे, मोठ्या संख्येतील आयटीयन्सच्या वास्तव्यामुळे वाकड, हिंजवडी परिसर गजबजलेला आहे. साधारण दीड लाख लोकसंख्येच्या तुलनेत मुलभूत सेवा-सुविधा, दळणवळणावर ताण येऊ लागला आहे. मुबलक पाणी, चोवीस तास वीजपुरवठा, कोंडीमुक्त रस्ते व इतर सेवा-सुविधा उपलब्ध करून स्वप्नवत प्रदुषणमुक्त हरित वाकड निर्माण करण्याचा तरुण उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते राम वाकडकर यांचा ध्यास आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी, बेस्ट सिटी अशी देशात ओळख आहे. येथे उद्योग, व्यवसाय, नोकरी व शिक्षणासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी वाकडला मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पसंती दिली. हिंजवडी ‘आयटी हब’मुळे या भागाचा झपाट्याने विकास झाला. मात्र, सद्यःस्थितीत रहदारी, पिण्याचे पाणी, सेवा रस्ते, खंडीत वीजपुरवठा व वाढते प्रदूषण या गोष्टींचा ताण उपनगरावर येत असल्याने पुढच्या पन्नास वर्षांचे दूरदृष्टी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांना सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून वाकडचा सर्वांगीण विकास करायचा आहे.

उमदे समाजाभिमुख व्यक्तिमत्व

शेतकरी कुटुंबात जन्मलेले राम वाकडकर हे यशस्वी उद्योजक आहेत. स्वतःला घडवत त्यांनी समाजाभिमुख वारसा व सामाजिक ऋणानुबंध जपले आहेत. सामाजिक भान जपत वाकडच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत त्यास मूर्त स्वरुप देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना ते सोबत घेत असतात. सामाजिक कार्य आणि वाकडच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. यशस्वी उद्योजक, हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख त्यांनी जनमानसात निर्माण केली असल्याने त्यांची सामाजिक ऋणानुबंधांची नाळ समाजातील सर्व घटकांशी जोडली गेली आहे. उच्चशिक्षित, तरुण, उमदे नेतृत्व, यशस्वी उद्योजक आणि समाज मनातला आश्वासक समाज सेवक, अशी छबी त्यांनी जनसामान्यांपासून युवक, तरूणाईमध्ये निर्माण केलेली.

युवकांची संघटनात्मक बांधणी
दिवंगत, कार्यसम्राट आमदार, गुरूवर्य, लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या मुशीत त्यांचा सामाजिक, राजकीय प्रवास सुरू झाला. तो अविरतपणे सुरू आहे. सुदृढ निर्व्यसनी समाज उभारणीसाठी तरुण विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी युवकांची मोठी संघटनात्मक बांधणी वाकड परिसरात उभी केलेली आहे.

वाकडच्या नवनिर्मितीचा ध्यास
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात मिळकतकर भरणारे वाकड उपनगर अशी वाकड परिसराची ओळख आहे. त्या तुलनेत येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा तोकड्या पडत चालल्याने लोकसंख्येच्या तुलनेत पुढील पन्नास वर्षांचे विकसित उपनगराचे विकासात्मक नियोजन करायचे आहे. येथील ५३ जागांवरील आरक्षणे विकसित करून त्या त्या ठिकाणी नियोजनात्मक विकास साधायचा आहे. मुलांसाठी क्रीडांगण, स्वतंत्र व्यापार संकुल, बाजारपेठ, स्वतंत्र भाजी मंडई, शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून थेट शेतकऱ्यांच्या मालासाठी व्यापारी संकुल उभारण्याचा मानस आहे. शेतकरी ते थेट ग्राहक या प्रक्रियेतील मध्यस्थी करणाऱ्या काही एजन्सी व कंपनीज हटल्यामुळे थेट शेतकरी व ग्राहकांना याचा लाभ मिळेल.

टँकरमुक्त वाकडचा संकल्प
वाकड परिसर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त प्रदूषण मुक्त असावा, असा संकल्प करून राम वाकडकर यांची त्या दिशेने सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडणारा पाणीपुरवठा सुरळीत करून टॅंकरमुक्त सोसायट्या, टॅंकरमुक्त वाकड असा संकल्प त्यांनी केला आहे. त्या दिशेने त्यांचे कार्य सुरू आहे.

प्रशस्त रस्त्यांचे जाळे
विकसित उपनगर घडवत असताना प्रभागातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते व सेवा रस्त्यांचा विकास करून प्रशस्त रस्त्यांचे जाळे त्यांना निर्माण करायचे आहे. पाणी बचत व साठवणुकीसाठी शिवकालीन रेन-हार्वेस्टिंग पद्धत अवलंबून राम वाकडकर यांना पाण्याच्या गरजांबाबत परिसराला स्वावलंबी करायचे आहे. वाढत्या वापराने वीजपुरवठ्यावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प प्रभागांतर्गत विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे.

नदी स्वच्छता व देखभाल
शहरातील पवना, मुळा नद्यांना प्रदुषणमुक्त करण्यासाठी महापालिका व केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता करून त्यात जाणाऱ्या सांडपाण्यासाठी पुनर्वापर करण्याचे त्यांच्या विचाराधीन आहे. एसटीपी प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र विकसित करण्याकडे त्यांचा विशेष भर राहणार आहे.

महिला सुरक्षा, आरोग्य सेवांवर लक्ष
उद्योगनगरी आणि ‘आयटी हब’मध्ये रोज असंख्य महिला नोकरी, रोजगार करतात. लोकसंख्येचा विचार करून महापालिकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणारे महिला प्रसूतीगृह व शंभर खाटांचा दवाखाना उभारण्याचाही राम वाकडकर यांचा संकल्प आहे. स्मार्ट सिटीला साजेशी साधने, सेवा तोकड्या पडत असल्याने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल आधुनिक बसथांबे, वर्दळीच्या सर्व ठिकाणी जागोजागी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे. पोलिस प्रशासन व इतर प्रशासनाकडे संपर्क, समन्वय साधण्यासाठी सजग व जागरूक तक्रार निवारण केंद्रांची ठिकठिकाणी निर्मिती करणे, केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिकेच्या नागरवस्ती, महिला बालकल्याण विभागांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाकडकर यांना काम करायचे आहे.

डिजिटल शाळांची निर्मिती
महापालिकेच्या शाळांमधून सर्व सेवा-सुविधांयुक्त डिजिटल शाळांची निर्मिती करून कष्टकरी, मध्यमवर्गीय, कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, तंत्रज्ञान देण्याचेही राम वाकडकर यांच्या मनात आहे. सीबीएससीच्या धर्तीवर महापालिका शाळा विविध भागात करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे बालवर्गापासूनच आधुनिक तंत्रज्ञानासोबत शाळांमधून शिक्षण मोफत उपलब्ध झाल्यास कुठल्याही घटकातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थी घडला तर देश घडेल. देशाला विकसित राष्ट्राकडे नेत विश्वगुरू करण्याच्या प्रवाहात दर्जेदार मुलांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार बालपणापासून घडविण्यासाठी वाकडकर यांना काम करायचे आहे. ज्येष्ठांसाठी नाना-नानी विरंगुळा पार्क, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र पदपथ, ज्येष्ठांच्या त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्याचा मानस आहे.


हरित प्रदुषणमुक्त वाकड
प्रदूषणमुक्त व हिरवाईसाठी ‘हरित वाकड’ या उपक्रमातून वृक्ष लागवड व संवर्धन करून प्रदूषणमुक्त वाकड व शहर करण्यासाठी समाज प्रबोधनातून लोकचळवळीच्या माध्यमातून हे काम वाकडकर यांना पूर्णत्वास न्यायचे आहे. सध्या प्रदूषणामुळे बकाल होत चाललेल्या वाकड उपनगराची ‘हरित वाकड’ ही ओळख निर्माण करायची आहे.

चौकातील वाहतूक बेटांची निर्मिती
रस्ते व चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी रस्ते-चौकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून चौकांना महापुरूषांची नावे देणे, मेट्रोला रस्त्यांची ‘कनेक्टिव्हिटी’ देणे, संपूर्ण भागांत मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना राम वाकडकर यांनी साकडे घातले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या लाखो नागरिकांना व स्थानिकांना जीवघेण्या कोंडीचा गेल्या अनेक वर्षांपासून सामना करावा लागत आहे. त्यामुळे, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ‘एलिव्हेटेड कॉरिडोर’ची निर्मिती व अन्य ठोस उपाययोजना तात्काळ करून कोंडीमधून सर्वांची सुटका करण्याची मागणी राम वाकडकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने सकारात्मक कार्यवाही सुरू झाली आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व
सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या राम वाकडकर यांनी विद्यापीठ स्तरावर खो-खो आणि कबड्डी संघांची स्थापना केली. योग्य व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केलेल्या राम वाकडकर यांनी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात घोलप महाविद्यालयाच्या स्वतंत्रपणे व ‘ना भूतो ना भविष्यती’ अशा भव्य दिव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करून दाखविले. निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत ८५ किलो वजन गटातून त्यांची महाराष्ट्र चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. यशस्वी उद्योजक ते कार्यक्षम समाजकारणी अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतः घडत असताना राम वाकडकर यांनी परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविले आहे. ट्रान्स्पोर्ट, बांधकाम, हॉस्पिटॅलिटी, पेट्रोल पंप, गॅस सर्व्हिसेस, फॅसिलिटी मॅनेजमेंट इत्यादी उद्योग क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत तरुणांपुढे प्रेरणा व आदर्श उभा केला आहे. व्यवसाय निपुण व्यक्तिमत्त्व राम वाकडकर यांच्या कंपन्यांद्वारे जिल्ह्यातील शंभरहून अधिक आयटी कंपन्यांत सेवा दिली जाते.

तरुणांना उद्योजक बनविण्यात योगदान
अनेक तरुणांना स्वतःची वाहने घेण्यास मदत करून त्यांच्या वाहनांना धंदा देत शेकडो तरुणांना व्यवसायात आणून राम वाकडकर यांनी उद्योजक बनवले आहे. पूर्वीच्या श्री इंटरप्रायजेस या फर्मचा आवाका, पसारा प्रचंड वाढला. श्री इंटरप्रायजेसने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या ट्रान्स्पोर्टचे मोठे भक्कम जाळे तयार केले. अशा प्रकारे श्री इंटरप्रायजेसचे रूपांतर श्री ट्रान्सलिंक इंडिया प्रा. लि. मध्ये झाले. आजमितीला श्री ट्रान्सलिंकमध्ये तब्बल पाच हजार लोक नोकरी करत आहेत. अनेकांचे संसार यावर उभे राहिले आहेत.

समाजकारणाशी नाळ कायम
उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला असला तरी त्यांनी समाजकारणाशी नाळ कायम ठेवून सामाजिक ऋणानुबंध जपले. समाजातील कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, व्यापार, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील गरजूंसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही क्षेत्रातील होतकरू मागे पडू नयेत, अशी त्यांची मुख्य धारणा आहे.

वाकड परिसरातील ‘जलमित्र’
वाकडमधील बहुतांश सोसायट्यांना भर उन्हाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागते. त्यासाठी राम वाकडकर यांच्याकडून जलमित्र ही योजना राबविली जाते. त्याद्वारे उन्हाळ्यात हजारो पाण्याचे टँकर सोसायट्यांना विनामूल्य पुरविले जातात. वाकडमधील शंभर सोसायट्यांना आमदार निधीतून विंधन विहीर (बोअरवेल) घेऊन त्यांची पाणी समस्या कायमची सोडविली आहे. दरवर्षी अपंग संस्थाना आर्थिक मदतीबरोबर अन्न-धान्य व शालेय साहित्य पुरविले जाते.

कोरोनाचा संकट काळ
कोरोनाच्या संकटकाळात समाज ऋणानुबंधाची जबाबदारी घेत राम वाकडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना संकटकाळात नागरिकांना मदतीचा हात दिला. परप्रांतीय बांधकाम मजुरांना व हजारो गरजू कुटुंबियांना राम वाकडकर युवा मंचामार्फत अन्नधान्य पाकिटांचे वाटप झाले. जागोजागी अन्नछत्र सुरू करून त्याद्वारे दररोज सुमारे पाच हजार रहिवाशांना अन्नदान करण्यात आले.

सुदृढ समाज निर्मितीचा ध्यास
विद्यार्थी दशेपासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राम वाकडकर यांनी भव्य दिव्य ‘वाकड ऑलिंपिक’चे आयोजन केले होते. त्यात २५ हून अधिक वैयक्तिक व सांघिक खेळांत हजारो खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्यांना हजारो रुपयांची बिक्षिसे देण्यात आली.

महिला सक्षमीकरणाचे भरीव कार्य
महिला सक्षम झाल्या; तर कुटुंब सक्षम होईल. पर्यायाने समाज सक्षम होईल. हे ओळखून वाकडकर यांनी जिजाऊ महिला बचत गट या नावाने असंख्य महिलांचे संघटन उभारून बचत गटांची आर्थिक चळवळ उभी केली आहे. महिलांना विविध प्रकारचे लघुउद्योग, घरगुती उद्योग, हस्तकला, बेकरी पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, शिवणकाम, ड्रायव्हिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते. वाहन परवाना व प्रशिक्षण या उपक्रमातून तीनशे महिलांना प्रशिक्षण व वाहन परवाना देण्यात आला आहे. त्यांचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे.

(शब्दांकन : रमेश मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Latest Marathi News Live Update : संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT