पिंपरी, ता. ३० : शहरातील पिंपरी कॅम्प येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल तसेच चिंचवड स्टेशन येथील पणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. ते दोन्ही पूल पाडा, असे पत्र रेल्वे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाठविले आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील उड्डाणपूल हा शहरातील सर्वात पहिला पूल आहे. या इंदिरा गांधी पुलाचे आयुष्य संपले असून, बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल वाहतुकीस बंद करा. पूल पाडून टाका, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे २ ते ३ वर्षे सुरू होते.
शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहे. हे दोन्ही पूल महापालिका पाडणार की, नव्याने पुन्हा तयार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल पाडण्याबाबत रेल्वे प्रशासनाचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. यापूर्वीच पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र आले आहे. त्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.