पिंपरी-चिंचवड

घरगुती व्यवसाय ते बिझनेसपर्यंतची ‘क्रांती’

CD

पिंपरी, ता. ३ ः त्या सर्व महिलांची परिस्थिती सर्वसाधारणच, संसार व मुलांचे शिक्षण यासाठी काहीबाही काम करत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या खऱ्या परंतु आपली ओळख निर्माण व्हावी, स्वतःचे काहीतरी असावे आणि खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सबल व्हावे, ही महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काहीतरी करण्याचे ध्येय समोर ठेवलेल्या निगडी प्राधिकरणातील महिला एकत्र आल्या आणि त्यातूनच क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गटाला सुरवात झाली. या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी मसाले, तिखट, हळद पावडर, पापड, कुरड्या, शेवया बनवायला सुरवात केली. अवघ्या दोनच वर्षांत त्यांची उत्पादने नावारूपास आली आणि या महिलांच्या उत्पादनांचा श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्टस् हा ब्रॅण्ड सुरू झाला.

शून्यातून सुरवात
कोरोनाच्या साथीतून २०२१ मध्ये जग सावरत होते. तेव्हाच क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गटाची सुरवात झाली. या सर्वच महिलांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. त्यामुळे सुरवातीला दुसऱ्या महिलांचा कच्चा माल घेऊन त्याचे पापड, मसाले या महिलांनी बनवून दिले. मागणीनुसार दिवाळीच्या पदार्थांचीही विक्री केली. भांडवल जमा झाल्यावर त्यांनी पापड, कुरड्या, तिखट, मसाले, हळद ही उत्पादने बाजारात आणली. ऑनलाइन विक्रीसोबतच पवनाथडीसारख्या विविध प्रदर्शनातून त्यांनी आपल्या उत्पादनाचे ब्रॅंडिग केले. व्यवसायात जम बसल्यानंतर या उत्पादनांना श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्टस् हे नाव दिले.

इतर महिलांना सहकार्य
या बचत गटातील १० ते १२ महिला पूर्णवेळ या व्यवसायासाठी काम करतात. मात्र, या गटातील काही वैयक्तिकरित्या विविध पदार्थ बनवतात. त्याचेही मार्केटिंग या गटाद्वारे केले जाते. गटातील काही जणी प्रत्यक्ष उत्पादन घेतात तर काही महिला मार्केटिंगचे काम करतात, काहीजणी प्रत्यक्ष विक्रीसाठी हातभार लावतात. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांनी यंत्रसामग्रीही घेतली असून इतर मोठ्या मसाल्यांप्रमाणेच आपलाही ब्रॅण्ड दुकानातून विकला जावा, हे ध्येय घेऊन या महिला काम करत आहेत. एकूणच आपल्यासोबत इतर महिलांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी या महिला प्रयत्नशील आहेत.

‘‘आमच्या गटातील सर्वच महिला सर्वसामान्य परिस्थितीतून आलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या योगदानामुळे आज आमच्या बचत गटाचा व्यवसाय प्रगतिपथावर आहे. आता पापड, शेवया यांचे उत्पादन आम्ही मशिनद्वारे घेत आहोत. मसालेही यंत्रावर तयार केले जात आहेत. इतर लोकप्रिय मसाल्यांप्रमाणेच या मसाल्यांचे योग्य पॅकेजिंग व ब्रॅंडिग करून ते बाजारात आणणे हाच माझा उद्देश आहे.
-ज्योती टोपे, अध्यक्षा, क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट

‘‘मी घरातच ज्वारीच्या पीठापासून विविध पदार्थ बनवते. या पदार्थांचे मार्केटिंग करण्यासाठी मला बचत गटातील महिलांची बरीच मदत होते. त्यांच्याही अनेक उत्पादनांची विक्री करण्यास मी हातभार लावते. एकमेकींना साहाय्य केल्याने व्यवसायात प्रगती होत आहे.

- विद्या गुरव, सचिव, क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट

‘‘आमच्या व्यवसायाच्या सुरवातीला अनेक अडीअडचणी आल्या. मात्र, आम्ही एकमेकींसाठी खंबीरपणे उभ्या राहिलो. या गटाच्या उत्पादनांच्या मार्केटिंगचे काम आम्ही करत आहोत. व्यवसायात पाय तर रोवला आहे. हा व्यवसाय कसा वाढेल, हाच विचार आज प्रत्येकीच्या मनात आहे.’
- सुरेखा फरांदे, सदस्या, क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट

‘‘प्रत्यक्ष उत्पादने बनवण्यात जरी माझा सहभाग नसला तरी उत्पादनांचे मार्केटिंग करणे, त्यांची विक्री करणे हे काम मी करते. कामांची विभागणी केल्याने सर्वजणी आपले काम जबाबदारीने पार पडतात.’
- दीपाली देवकर, सदस्या, क्रांती महिला स्वयंसाह्यता बचत गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT