पिंपरी, ता. ३ ः महापालिकेच्या शाळांमधील १५ गुणवंत विद्यार्थी सहा दिवसांसाठी भारत दर्शन अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. बंगळूर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर येथे विविध संस्थांना ते भेटी देणार आहेत. त्यात पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अभ्यास दौऱ्यात सहभागी विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय विज्ञान संस्थेला भेट देणार आहेत. शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राचा अभ्यास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती त्यांना मिळणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक त्यांच्यासमवेत आहेत. भारत दर्शन उपक्रम महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अनुभव देऊन समाजासाठी योगदान देऊ शकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा त्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. विद्यार्थी अशा प्रेरणादायी प्रवासाचा भाग बनत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजय थोरात यांनी सांगितले.
‘‘भारत दर्शन अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सुरू केला आहे. यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे विचारविश्व अधिक व्यापक होऊन, त्यांना अनोखी प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---
फोटोः 68015
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.