पुणे, ता.३ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात आर्यन्स वर्ल्ड, सेंट हेलेना संघांनी चमकदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. अभिनव विद्यालय, एसपीएम पब्लिक, सरदार दस्तूर संघांनी सलग दोन विजय प्राप्त केले.
डेक्कन जिमखाना मैदानाच्या बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड संघाने नवी सांगवीच्या द न्यू मिलेनियम संघावर १२ - ४ अशी मात केली. विजयी संघाकडून वरदा घाडगे, अवनी कदम, अवनी चव्हाण यांनी आक्रमक खेळ केला. पराभूत संघाकडून प्रतिभा लांबा, मिताली फेगडे यांनी दिलेली लढत अपुरी पडली. कॅम्पमधील सेंट हेलेना संघाने येरवडा येथील विबग्योर संघावर ३० - ० असा एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी वाकडच्या विस्डम वर्ल्ड संघावर २८ - २२ अशी मात केली.
एरंडवणे येथील अभिनव विद्यालयाने नवी सांगवीच्या द न्यू मिलेनियमवर १८ - ४ असा विजय मिळवला. अन्य एका सामन्यात पाषाणच्या सेंट जोसेफ संघाला १७ - १० ने नमवून दुसरा विजय संपादन केला. कॅम्पमधील सरदार दस्तूर संघाने कोंढव्याच्या पीजीकेएम संघावर ३२ - २ अशी सहज मात केली. तसेच या संघाने विद्या प्रतिष्ठान पब्लिक, नांदेड सिटीचा ३३ - ९ असा पराभव केला.
एसपीएम पब्लिक संघाने देखील सलग दोन विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली. पहिल्या सामन्यात कल्याणीनगर येथील द लेक्सिकॉन इंटरनॅशनल संघावर २१ - ३ असा एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात ताथवडे येथील इंदिरा नॅशनल स्कूलवर २२ - १८ अशी मात केली.
निकाल :
सेंट जोसेफ, पाषाण १६ वि.वि. आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी १२. विस्डम वर्ल्ड, वाकड १४ वि.वि. एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड ११. द लेक्सिकॉन इंटरनॅशनल, कल्याणीनगर २० वि.वि. सीपी गोयंका इंटरनॅशनल, वाघोली २. एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड १९ वि.वि. विबग्योर, येरवडा ४. इंदिरा नॅशनल, ताथवडे १८ वि.वि. सीपी गोयंका इंटरनॅशनल, वाघोली १. पीजीकेएम, कोंढवा ७ वि.वि. सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव ६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.