पिंपरी, ता. ३ : गाडीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून एका तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाला मोटारीने धडक देत बोनेटवरून काही अंतरापर्यंत फरफटत नेले. ही घटना आकुर्डी रेल्वे स्थानक ते बिजलीनगर या दरम्यान घडली.
जेकेरिया जेकब मॅथ्यू (वय २३, रा. अण्णा भाऊ साठेनगर वसाहत, निगडी) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश ऊर्फ अशोक पाटील (वय २३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या चंद्रकांत म्हाळसकर (वय २६, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कर दराडे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. दरम्यान, कमलेश याने त्याच्या मोटारीने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. याबाबत फिर्यादी यांनी कमलेश याला जाब विचारला असता, कमलेश आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांना मोटारीने धडक दिली. त्यात फिर्यादी हे मोटारीच्या बोनेटवर पडले असता, आरोपींनी फिर्यादी यांना बोनेटवरून आकुर्डी रेल्वे स्थानक येथून छत्रपती संभाजी चौक, बिजलीनगरपर्यंत नेले. दरम्यान, मोटारीतील महिलेला उतरविण्यासाठी मोटार थांबली असता, फिर्यादी हे बोनेटवरून खाली उतरले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपी पसार झाले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.