पिंपरी, ता. ७ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या अपघाताचे सत्र सुरुच आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या दहा महिन्यांत ५५ अपघात झाले आहेत. यामध्ये काही नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. तर काही गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच, लगतच्या ग्रामीण भागातही बस सेवा पुरवली जाते. या बसगाड्या विविध मार्गावर धावतात. दरम्यान, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्यालगत असलेले पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणामुळे अपघात होत असतात. मात्र, अनेकदा पीएमपी बसवरील चालकाला गर्दीत वाहन चालविण्याच्या अनुभवाचा अभाव, बसवरील नियंत्रण सुटणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, यामुळे देखील अपघात होत असल्याचे समोर येते. तसेच, इतर वाहन चालकांनी बससमोर अचानक वाहन थांबविणे, बीआरटी मार्गात अचानक खासगी वाहन घुसवणे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, यामुळे बसचालकाचा गोंधळ उडतो. अशावेळीही अपघाताच्या घटना घडतात.
चालकांना प्रशिक्षणाची गरज
एकूण अपघातात भाडे तत्त्वावरील बसच्या अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येते. दरम्यान, प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा वेग किती असावा, प्रवासी बसमध्ये बसताना उतरताना काळजी घेणे, गर्दीतून जाताना बस कशी चालवावी, यासह वाहतुकीचे नियम पाळणे, याबाबतचे प्रशिक्षण ठेकेदाराच्या बसवरील चालकांना देणे गरजेचे आहे.
सर्व वाहन चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात असते. सुरक्षितरीत्या वाहन चालविण्यासह प्रवाशांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात येतात. वाहतूक पोलिसांकडूनही नियमांबाबतची माहिती दिली जाते. यासह बसच्या देखभाल दुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले जाते.
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
----------------------
या महिन्यातील घटना
२ डिसेंबर
पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे येथे घडली. यामध्ये नितीन बापूराव शिंदे (वय ३७, रा. नाणेकरवाडी, खेड) या व्यक्तीचा मृत्यू झाला.
२ डिसेंबर
पुणे- नाशिक मार्गावर वाकी येथे पीएमपी बसची वाहनाला धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले.
------------
या वर्षातील अपघात
यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात एकूण ५५ अपघात झाले आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. अपघात होणाऱ्या बसमध्ये खात्यापेक्षा भाडे तत्त्वावरील बसचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.