पिंपरी, ता. ७ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने दूरदृष्टिकोनातून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दिव्यांग भवन, वेस्ट टू एनर्जी यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत. हे स्तुत्य उपक्रम आणि प्रकल्प अनुकरणीय आहेत, असे मत पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध प्रकल्प, उपक्रम आदी ठिकाणी पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी भेट दिली. त्यानंतर त्या महापालिका अधिकारी व प्रकल्प समन्वयकांसाठी बोलत होत्या. महापालिकेतर्फे सुरू असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडून माहिती घेतली. नवीन इमारतीची रचना जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अविनाश शिंदे, मनोज लोणकर, संदीप खोत, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापालिकेचे असेही प्रकल्प
- मोशी येथील वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प, बांधकाम राडारोडा प्रक्रिया केंद्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी माहिती घेतली. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी त्यांना माहिती दिली.
- मोरवाडी येथे महापालिकेने उभारलेल्या दिव्यांग भवनालाही मनीषा आव्हाळे यांनी भेट दिली. यावेळी समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिव्यांग भवनाची व तेथील उपक्रमांची माहिती दिली.
- निगडी येथील आयसीसीसी या महापालिकेच्या प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. स्मार्ट सिटीचे किरणराज यादव, लेखाधिकारी सुनील भोसले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, काँप्युटर प्रोग्रामर संजय जाधव यांनी प्रणालीची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.