पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

टोळक्याने माजवली चिंचवडमध्ये दहशत
पिंपरी ः हातात कोयते घेवून आरडाओरडा करीत आलेल्या चौघांच्या टोळक्याने परिसरात दहशत माजवली. महिलेवर कोयता उगारून वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच, एका मुलीच्या अंगावर दुचाकी घातली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार चिंचवडमधील मोहननगर येथे घडला. सुमीत दाभाडे (वय २१), अक्षय कापसे (वय २०, दोघेही रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोन्या काळे, प्रतीक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मोहननगर येथे शतपावली करत असताना आरोपी दुचाकीवरून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत, कोयते फिरवत आरडाओरडा करत आले. ‘इथला भाई आम्हीच आहे’. आमच्याशी भिडण्याची कोणाची हिम्मत नाही. कोणी आडवा आला तर डायरेक्ट ३०२’ असे म्हणत दहशत निर्माण केली. आरोपी सोन्या काळे याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली तर सुमीत दाभाडे याने महिलेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच अक्षय याने फिर्यादी महिलेच्या भाचीच्या अंगावर दुचाकी घातली. फिर्यादी आणि त्यांची भाची तिथून पळून गेल्या. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------
ट्रकची मोटारीला धडक; महिला जखमी
पिंपरी ः ट्रकने मोटारीला दिलेल्या धडकेत मोटारीतील महिला जखमी झाली. हा अपघात हिंजवडी फेज तीन येथे घडला.
याप्रकरणी ऋषभ जयराम पवार (वय २९, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीग्यान सिंग (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हिमांशू याने त्याच्या ताब्यातील ट्रकने फिर्यादी यांच्या मोटारीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांची पत्नी जखमी झाली आहे.
------------
जुन्या भांडणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना पिंपरीतील विठ्ठलनगर येथे घडली. हितेश वाल्मीकी (वय १९, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत वाघमारे (वय २४, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि रितिक बनसोडे (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हितेश पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत आणि रितिक दुचाकीवरून आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून हितेश यांच्यावर चाकूने वार केले. दोघांनी मिळून हितेश यांना मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. अनिकेत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संत तुकाराम नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT