पिंपरी-चिंचवड

आणखी ८० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरणार कामाच्या वाढत्या ताणामुळे ‘पीएमआरडीए’ची कार्यवाही

CD

पिंपरी, ता. ७ : कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आणि अपुरी संख्या पाहता आणखी ८० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. सध्याच्‍या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अतिक्रमण निर्मूलन विभागामध्ये चाळणी पद्धतीने कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी नव्याने बीव्हीजी या कंपनीला मनुष्यबळाचा ठेका देण्यात आला आहे. उपलब्ध मनुष्यबळावर प्रशासकीय कामाचा ताण पडत आहे. बाह्यस्त्रोतामार्फत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खासगी संस्थांमार्फत कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. संबंधित एजन्सीच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या प्रशासकीय सेवेत अभियंतासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत.
मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे त्यांचे काम वेळेत होत नाही. त्यामुळे नागरिकांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ पीएमआरडीए प्रशासनावर आलेली आहे. नागरिकांची प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीएने कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. दरम्यान, यापूर्वी असलेल्या कंपनीचे जवळपास पावणे तीनशे कर्मचारी होते. मात्र, कंपनी बदलल्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात केल्या. मात्र, पुन्हा नव्याने कर्मचारी भरताना केवळ साठ टक्केच कर्मचारी घेतले. म्हणजेच १८५ कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेतले होते. मात्र, कामाचा ताण वाढल्याने आणखी काही पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार आणखी ८० पदांची भरती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT