पिंपरी, ता.७ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने पुणे येथे आयोजित ६१ व्या टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अमोल पाटील (टाटा मोटर्स), प्रौढ गटात संतोष माडिकंट (एचईएमआरएल) यांनी विजेतेपद पटकाविले. महिला एकेरी गटात कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) हिने तर पुरुष दुहेरी गटात मनीष मुंज, अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) यांनी अजिंक्यपद मिळविले.
पुण्यातील शारदा कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्राज इंडस्ट्रीजचे मार्केटिंग हेड उदय कुलकर्णी, औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, विजय हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरी देशपांडे, प्रदीप वाघ, संतोष शिंदे, श्रीनिवास मोरे, राहुल कापसे, अविनाश जोशी, श्रीकांत केळकर आदी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी खेळाडूंची खेळाप्रती असलेली निष्ठा व प्रेम पाहून आनंद व्यक्त केला. संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. तर नरेंद्र कदम यांनी संघटनेच्या कामाबद्दलची खेळाडूंना माहिती दिली. प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले. हरी देशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी स्पर्धेचे आयोजक अविनाश जोशी यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंतर्फे संतोष माडीकंट, योगेश मुळे यांनी मते व्यक्त केली.
या स्पर्धेत टाटा मोटर्स, बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, एसकेएफ, फॉरविया, फ्लीटगार्ड फिल्टर्स, जेसीबी, सिग्मा इलेक्ट्रिकल्स, सँडविक एशिया आदी १६ कंपन्यांच्या १५९ पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला.
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) विरुद्ध अमोल पाटील (टाटा मोटर्स) अशी लढत झाली. त्यामध्ये अमोल पाटील याने ९ - ११, ४ - ११, २ - ११ अशी मात करत अजिंक्यपद प्राप्त केले.
पुरुष एकेरी प्रौढ गटाच्या अंतिम लढतीमध्ये उदय गडीकर (कॅरियर)ला संतोष माडिकंट(एचईएमआरएल) याने १२ - १४, ४ - ११, ७ - ११ असे हरवत विजेतेपद मिळविले. तर महिला एकेरी गटात कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) हिने नेहा बाविस्करला (टाटा मोटर्स) ६ - ११, ११ - ९, ११ - ९, ११ - ५ असे नमवत विजेतेपद मिळविले. पुरुष दुहेरी गटाच्या लढतीत अमोल पाटील, साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स) जोडीला मनीष मुंज, अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) विरुद्ध ८ - ११, ८ - ११, १३ - ११, ८ - ११ असा पराभव पत्करावा लागला.
उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे -
पुरुष एकेरी गट ः अमित पाटील (बजाज ऑटो, आकुर्डी) पराभूत विरुद्ध आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) ८ - ११, ११ - १३,५ - ११. अमोल पाटील (टाटा मोटर्स) वि.वि. प्रशांत कुमावत (टाटा मोटर्स). ११ - ८,११ - ९,११ - ५.
पुरुष एकेरी प्रौढ गट ः नितीन आपटे (फ्लीटगार्ड फिल्टर्स) पराभूत विरुद्ध उदय गडीकर(कॅरियर) ८ - ११, ४ - ११,११ - ५, २ - ११. विवेक फडणीस (एल अँड टी) पराभूत विरुद्ध संतोष माडीकंट(एचईएमआरएल) ११ - ९,११ - ८,६ - ११, ८ - ११, ६ - ११. पुरुष दुहेरी गट ः अमोल पाटील, साहेबराव सूर्यवंशी (टाटा मोटर्स) वि.वि. अमित पाटील, श्रेयस श्रॉफ (बजाज ऑटो, आकुर्डी) ११ - ७, १२ - १०, ११ - ७. प्रशांत कुमावत, आर्यभ्रता रे (टाटा मोटर्स) पराभूत विरुद्ध मनीष मुंज, अनुपम नलावडे (टाटा मोटर्स) ११ - ६, ७ - ११, ११ - ४, ६ - ११, ९ - ११.
PNE24U69298
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.