पुणे, ता.७ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भावे हायस्कूल, सिंबायोसिस यांनी विजयी घोडदौड कायम राखली.
डेक्कन जिमखाना मैदानावर हे सामने सुरू आहेत. सिंबायोसिस संघाने आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटी संघावर २५ - २२, २५ - १८ अशी मात केली. विजयी संघाकडून समर्थ साळुंके याने उल्लेखनीय खेळ केला. पराभूत संघाकडून शिवम नाकील हा चमकला. सिंबायोसिस संघाने दुसऱ्या सामन्यात बारामतीच्या चैतन्य इंटरनॅशनल संघाचा २५ - १९, २५ - १५ असा पराभव केला.
भावे हायस्कूल संघाने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संघाचा २५ - १२, २५ - १९ असा चुरशीच्या लढतीनंतर पराभव केला. भावे हायस्कूल संघाने दुसऱ्या सामन्यात प्रियदर्शनी विद्यामंदिर संघाचा २५ - १७, २५ - २० असा अटीतटीच्या लढतीनंतर पराभव केला. विद्या प्रतिष्ठान संघाला अन्य सामन्यात पाषाण येथील लोकसेवा इंग्लिश संघाकडून पुढे चाल मिळाली. प्रियदर्शनी विद्यामंदिर संघाने पाषाणच्या लोकसेवा संघाला २५ - १०, २५ - १५ असे सरळ दोन सेटसमध्ये पराभूत केले. विजयी संघाकडून सोहम साखरे चमकला; तर पराभूत संघाकडून साई वाघमारे याची लढत अपुरी ठरली. चैतन्य इंटरनॅशनल संघाने उरुळी कांचन येथील जेएसपीएम जयवंत पब्लिक संघाला २ - ० अशा सेटसमध्ये पराभूत केले. आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी संघाने अन्य सामन्यात जेएसपीएम संघाला २५ - ११, २५ - १२ असे पराभूत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.