पिंपरी-चिंचवड

शुल्क आकारले, सुविधांना नाकारले ‘पीएमआरडीए’च्‍या सेक्टर ३० येथील कन्वेनियंस शॉपिंग सेंटरचा कारभार

CD

पिंपरी, ता. ११ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर ३० येथील कन्वेनियंस शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्‍या देखभाल दुरुस्तीची वानवा आहे. शुल्‍क घेऊनही ही अवस्‍था असल्‍याचे गाळेधारक सांगत आहेत.
सुविधा नसतील तर प्रतिगाळा जमा केलेले देखभाल दुरुस्ती शुल्क परत घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज केला आहे. एकूण २८ जणांनी हा अर्ज केला आहे तर आठ दिवसांत गाळेधारकांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात ‘पीएमआरडीए’ अंतर्गत सेक्टर ३० येथे कन्व्हेनियंस शॉपिंग सेंटर विकसित केले आहे. त्यामधील गाळ्यांचा ताबा मागील वर्षी देण्यात आला आहे. शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीसह गाळेधारकांना तत्सम सुविधा देण्यासाठी ६४ हजार ५०० इतके शुल्क आकारण्यात आले आहे. या कामासाठी गाळेधारक आणि ‘पीएमआरडीए’ यांच्यात कायदेशीर करार झाला. शुल्क जमा करून दहा ते अकरा महिने उलटले तरी ‘पीएमआरडीए’कडून कसल्याही सुविधा पुरवल्या नसल्याची तक्रार गाळेधारकांनी केली आहे.
अनेक तक्रारी गाळेधारकांनी ‘पीएमआरडीए’कडे केल्‍या आहेत. स्वच्छतागृहातील नळ व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. वारंवार कळवूनही त्याठिकाणी नवीन वस्तू बसविण्यात आलेल्या नाहीत. देखभाल दुरुस्तीअभावी स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी ‘पीएमआरडीए’ प्रशासनावर नाराजी व्यक्त करत देखभाल दुरुस्तीसाठी जमा केलेले शुल्क परत करावेत, अशी मागणी करत गाळेधारकांनी अर्ज केला आहे. गाळेधारक गणेश जाधव, विजय लंके, वरुण पोकळे, मोहिनी भोंडवे, स्वप्नील शिराळ, स्वप्नील भालेकर, सुयोग चोपडा, मच्छिंद्र कुमावत, योगेश बेलदार, सुहास मवाळ, रितेश भावसार, शैलेश हंडी आदीसह एकूण २८ जणांनी शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.

गाळेधारकांनी त्यांच्या वापराचे वीज बिल महावितरणला जमा करावयाचे आहे. ‘पीएमआरडीए’ आणि गाळेधारक यांच्यात झालेल्या करारपत्रानुसार हे बिल ‘पीएमआरडीए’ भरणार नाही. गाळेधारकांची सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया राबवून शॉपिंग सेंटरचा त्यांच्याकडे ताबा दिला जाईल. सोसायटीतील सार्वजनिक शौचालये, लिफ्ट, नळ कनेक्शन, सोलर यंत्रणा असे सर्व प्रश्न सोडविले जातील. त्यांची महापालिकेकडे नोंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. हे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी किमान आठ दिवसांचा अवधी अपेक्षित आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्‍या उपअभियंता रश्मी पाटील यांनी दिली.

चौकट :
या आहेत तक्रारी -
- शॉपिंग सेंटरमधील विद्युत वापराचे सामाईक वीज बिल महावितरणशी संबंधित विद्युत कार्यालयात जमा केले नाही.
- महावितरणकडून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विद्युत प्रवाह खंडित.
- सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
- गाळेधारकांच्या मालमत्तेची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे नोंद केलेली नाही.
- शॉपिंग सेंटरमध्ये हक्काचे नळ कनेक्शन नाही. त्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केलेला नाही.
- ऑन ग्रीड मीटर नसल्यामुळे सोलर यंत्रणा कार्यरत नाही.
- लिफ्टसाठी बॅकअप बॅटरी उपलब्ध नाही.
- प्रत्येक मजल्यावर बाल्कनीमध्ये पाणी साचते.
--------------------
फोटो ः 70373

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT