पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीत पाणीबाणी ः लोगो -------------- पाणी चोरी रोखण्याचे आव्हान महापालिकेकडून पाच वर्षांपासून उपाययोजना; अद्याप अपयश

CD

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः शहरासाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या ६३० दशलक्ष लिटरपैकी ४० टक्के अर्थात २५२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी चोरी व गळतीचे प्रमाण आहे. नियोजनानुसार, १५ टक्के गळतीचे प्रमाण ग्राह्य धरले जाते. ते वगळल्यास २५ टक्के अर्थात १५७.५० दशलक्ष लिटर पाण्याची चोरी रोखल्यास नियमित पाणीपुरवठा करणे सोयीचे होईल. पण, पाणी चोरी व गळती कधी रोखणार? दिवसाआडऐवजी दररोज पाणी कधी मिळणार? असे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.
पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या खोऱ्यात पिंपरी-चिंचवड शहर वसले आहे. त्यामुळे भौगोलिक रचना उंच सखल आहे. शिवाय, महापालिकेचे निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील आणि चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र शहराच्या उत्तरेला व एका टोकाला आहेत. त्यामुळे पूर्वेकडील चऱ्होली, दिघी आणि दक्षिणेकडील बोपखेल, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे निलख, रहाटणी, पिंपळे सौदागर हे भाग तुलनेने जलशुद्धीकरण केंद्रापासून जास्त अंतरावर आहेत. शिवाय, दिघी, भोसरी, चऱ्होलीचा काही भाग, स्पाइन रस्ता, संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर, थेरगाव, रहाटणी ही गावे उंचावर आहेत. तर नदीकाठची गावठाणे व नवीन उपनगरे खोलगट भागात आहेत. त्यामुळे उंचावरील व जलशुद्धीकरण केंद्रापासून अधिक अंतरावरील गावांना कमी दाबाने व अपुरे पाणी मिळत होते. तर, सखल भागात पाणी वाया जात होते. शिवाय, जुन्या जलवाहिन्या व नळजोड यांमुळे पाणी गळती व चोरीचे प्रमाण ४० टक्क्यांवर आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत सारथी हेल्पलाइनसह नागरिकांच्या थेट तक्रारी यायच्या. हंडा मोर्चा, आंदोलने, निदर्शने याच काळात झाली. त्यावर उपाययोजना म्हणून तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आणि अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, अनधिकृत नळजोड शोधण्याचे काम खासगी संस्थेमार्फत पाच वर्षांपासून सुरूच आहे. अद्याप ते पूर्ण न झाल्याने व अमृत योजनेअंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकून नवीन नळजोड देण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने चोरी व गळतीचे प्रमाण जैसे-थे आहे. परिणामी दिवसाआड पाण्यापासून नागरिकांची अद्याप सुटका झालेली नाही.

मंजूर पाणी कोटा व प्रत्यक्ष वापर (दशलक्ष लिटर)
- पवना धरण ४९० मंजूर, वापर ५१० ते ५२०
- आंद्रा धरण १०० मंजूर, वापर ८० ते ८५
- एमआयडीसीकडून विकत ३०
- दररोज एकूण घेतले जाणारे सरासरी पाणी ६३०
(भविष्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे नियोजन)

दृष्टिक्षेपात भविष्यातील पाणी
- भामा-आसखेड धरण ः १६७
- मुळशी धरणातून मागणी ः ७६०
- पवनातून मिळणारे ः ५२०
- आंद्रातून मिळणारे ः १००
(मावळातील ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याचेही नियोजन आहे)

गृहिणी म्हणतात...
पूर्वी दररोज पाणी यायचे. आता दिवसाआड येत आहे. दोन्ही प्रकारची पाणीवितरण व्यवस्था व्यवस्थित आहे. पण, दररोज पाणी येत असल्याने वाया जात होते. आता काटकसर करून पाणी पुरवून वापरण्याची सवय झाली आहे. दिवसाआड का होईना, पुरेशा दाबाने पुरेसे पाणी मिळायला हवे.
- रंजना जाधव, ममतानगर, जुनी सांगवी

‘‘दिवसाआड पाणी सोसायट्यांमध्ये पुरत नाही. दोन दिवस पाणी पुरवण्यासाठी साठवून ठेवावे लागते. त्यासाठीची सुविधा नसणाऱ्यांना तुटवडा जाणवतो. २४ तास पाणी दिल्यास साठवायची गरज राहणार नाही. हवे तेव्हा, हवे तितकेच पाणी वापरता येईल. याचा विचार प्रशासनाने करावा.
- सुगंधा राऊत, पाटीलनगर, चिखली

‘‘दिवसाआड पाणी योग्यच आहे. यामुळे पाण्याची बचत होते. ते जपून वापरले जाते. पण, रात्री बारानंतरसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. त्याचा महिलांना अधिक त्रास होतो. पाण्याची वेळ मध्यरात्रीऐवजी पहाटेपासून केल्यास सोयीचे होईल. दोन दिवस पुरण्यासाठी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हायला हवा.
- रत्नमाला आमले, किवळे

‘‘दिघी परिसरातील उंचावरील भागात कमी दाबाने पाणी येते. उतार व सखल भागात पुरेसे पाणी मिळते. सकाळी केवळ एक तासच पाणी मिळते. दोन दिवस पुरेल इतका साठा करता येत नाही. रात्री-अपरात्री होणारा पाणीपुरवठा गैरसोयीचा आहे. २४ तास पाणी मिळाल्यास सर्व प्रश्न सुटतील.
- माया वाळके, दिघी
---
फोटो ७०४४०, ४४
निगडी जलशुद्धीकरण प्रकल्प फोटो पाठवत आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT