पिंपरी-चिंचवड

डॉ.सायरस पूनावाला, विश्वकर्मा संघ विजेते

CD

पुणे, ता.११ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्समध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात उरुळी कांचन येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम संघाने तर मुलींच्या गटात बिबवेवाडी येथील विश्वकर्मा विद्यालयाने विजेतेपदाला गवसणी घातली. आर्यन्स वर्ल्ड संघाच्या भिलारेवाडी येथील मुलांच्या संघाने रौप्यपदक मिळविले; तर मुलींत वारजेच्या संघाला ब्राँझ पदक मिळाले.
नेहरु स्टेडियम येथील पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मैदानावर वरील स्पर्धा झाली. मुलांच्या अंतिम फेरीत डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम संघाने भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड संघाचे आव्हान ३४ - २४ असे परतवून लावले. मध्यंतराला दोन्ही संघ १७ - १७ असे बरोबरीत होते. मात्र, उत्तरार्धात डॉ.सायरस पूनावाला संघाने वेगवान खेळ करत विजेतेपद खेचून आणले. सिद्धेश जाधव याच्या अष्टपैलू खेळाला त्याचे द्यावे लागेल. त्याला श्लोक सुंदरानी आणि शुभम सानप यांनी उत्कृष्ट चढाया करत चांगली साथ दिली. आर्यन्स वर्ल्ड संघाकडून शंतनु नवले याने पकडीमध्ये सुरेख खेळ केला.
ब्राँझ पदकाच्या लढतीत न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय संघाने धनकवडीच्या पुणे केंब्रिज पब्लिक संघावर २७ - १५ असा शानदार विजय मिळवला. उपांत्य फेरीतील दोन्ही लढती शेवटपर्यंत रंगतदार झाल्या. डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम संघाने श्री मल्लिकार्जुन विद्यालय संघाचे आव्हान ३० - २८ असे चुरशीच्या लढतीनंतर संपुष्टात आणले होते. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी संघाने पुणे केंब्रिज संघावर ५५ - ५४ असा केवळ एक गुणाने रोमहर्षक विजय नोंदविला होता.
मुलींच्या अंतिम सामन्यात विश्वकर्मा विद्यालय संघाने प्रियदर्शनी विद्या मंदिर संघावर ३९ - १७ असा विजय मिळविला. मध्यंतराला त्यांनी २० - ११ अशी चांगली आघाडी घेतली होती. विश्वकर्मा विद्यालय संघाकडून नीलम जाधव हिने उत्कृष्ट चढाया केल्या; तर श्रेया वाल्हेकर हिने पकडी घेतल्या. पराभूत संघाकडून श्रेया चव्हाण हिने चढाईमध्ये कौशल्य दाखविले. तर अनन्या पोतदार हिने अष्टपैलू खेळ केला.
ब्राँझ पदकासाठी झालेल्या लढतीत वारजेच्या आर्यन्स वर्ल्ड संघाने नऱ्हे येथील सिग्नेट पब्लिक संघाचे आव्हान ३० - २३ असे परतविले. अटीतटीने झालेल्या या लढतीत आर्यन्स वर्ल्डने मध्यंतराला १७ - १० अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून श्रावणी सर्जेराव हिने चढाईमध्ये तर दर्शिता नांदगावकर हिने पकडीमध्ये सुरेख कामगिरी केली. पराभूत संघाकडून अनन्या बाबर हिने खोलवर चढाया करत एकाकी लढत दिली.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीमध्ये प्रियदर्शनी विद्या मंदिर संघाने आर्यन्स वर्ल्ड संघाला २३ - १८ असे पराभूत केले. तर विश्वकर्मा विद्यालय संघाने सिग्नेट पब्लिक संघावर ५५ - १५ अशी मात केली.


मुली - PNE24U70458, PNE24U70461, PNE24U70463

मुले - PNE24U70450, PNE24U70451, PNE24U70453

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT