पिंपरी-चिंचवड

शिवराज, झुबेर, आश्वी, कादंबरीला अजिंक्यपद

CD

पुणे, ता. ११ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या १०० मीटर धावणे प्रकारात शिवराज काळे, झुबेर सय्यद यांनी तर मुलींत आश्वी टकले, कादंबरी शेलार यांनी अजिंक्यपद पटकाविले. चार बाय १०० मीटर रिले प्रकारात कोथरुडच्या बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम आणि फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे सैनिकी विद्यालय संघाने बाजी मारली.
सारसबागेजवळील बाबुराव सणस क्रीडांगण येथे वरील स्पर्धा सुरू आहेत. रिले प्रकारात १० ते १२ वर्षे मुलींमध्ये कोथरुडच्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम संघ (६३ सेकंद), लांडेवाडीच्या न्यू इंग्लिश स्कूल (६४.८), रेसकोर्स येथील आर्मी पब्लिक (६५.८) या संघांनी पदकांची कमाई केली. तर मुलांच्या १४ ते १६ वर्षे गटात फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे सैनिकी विद्यालय (५४.५), एरंडवणेचे अभिनव विद्यालय, एरंडवणे (५४.८) आणि भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड संघांनी (५७.८) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त केले.

निकाल
गोळा फेक ः १० ते १२ वर्षे मुले - नाखेन कोन्याक (लोकसेवा इंग्लिश, फुलगाव ११.४९ मीटर), मयुरेश उबरे (प्रगती इंग्लिश, धानोरी १०.४२), ध्रुव पवार (सिटी प्राईड, चिखली ९.४१). मुली - ध्रुवी देसाई (भक्ती वेदांत मॉडेल, येवलेवाडी ७.९९), दुर्वा गारगोटे (सेंट अर्नोल्ड सेंट्रल, वडगाव शेरी ६.८८), मृणाल लुंकड (आदित्य इंटरनॅशनल, आळंदी रस्ता ६.०२). १४ ते १६ वर्षे मुले - देवेश क्षीरसागर (सिंहगड स्प्रिंग डेल, १५.१५ मी), आदित्य काळभोर (डीईएस, टिळक रस्ता १०.४०), वेदांत रणसिंग (ढोले पाटील स्कूल, खराडी ९.९६). मुली - अद्विती देवळे (सेंट मिराज, पुणे स्टेशन ८.४६), अद्विता भोकरे (हुजूरपागा सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्रजी, लक्ष्मी रस्ता ६.५२), दुर्वा मिरघे (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव ६.५२).
लांबउडी ः १२ ते १४ वर्षे मुले - अवधूत देशमुख (अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्रजी, आंबेगाव, ४.६० मीटर), सुकृत जोशी (बाल शिक्षण मंदिर, कोथरूड ४.६०), शिवतेज गायकवाड (केंद्रीय विद्यालय, गिरिनगर ४.५४). १४ ते १६ वर्षे मुले - सार्थक कुंजीर (एंजेल हायस्कूल, उरुळी कांचन ५.७२ मीटर), श्रेयस रागडे (एंजेल हायस्कूल, उरुळी कांचन ५.०४), तेजस गरासे (सिटी प्राईड, ४.९७). मुली - आरोही दिवेकर (बाल शिक्षण मंदिर, ४.६८), केतकी कुंटे (ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ ४.३९), जान्हवी मेमाणे (अभिनव विद्यालय, ३.८१).
८० मीटर धावणे ः १० ते १२ वर्षे मुले - आदित्य कुमार (डॉ. सायरस पूनावाला, उरुळी कांचन ११ सेकंद), वेदांत वाघ (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव ११.४), दिलास्तो नगाडोंग (लोकसेवा इंग्लिश, फुलगाव ११.५). मुली - अरिणी यादव (न्यू इंग्लिश स्कूल, शनिवार पेठ १२.१), स्पृहा पांगारे (बाल शिक्षण मंदिर, कोथरूड १२.४), बटूल रेतीवाला (संस्कृती स्कूल, उंड्री १२.६).
१०० मीटर धावणे ः १२ ते १४ वर्षे मुले - झुबेर सय्यद (सेंट अरनॉल्ड सेंट्रल, वडगाव शेरी १२.८ सेकंद), हितांश मोमाया (एमआयएस इंटरनॅशनल, बालेवाडी १३.३), साई दंडवते (इंडस इंटरनॅशनल, मुळशी १३.५). मुली - कादंबरी शेलार (शेठ दगडूराम कटारिया, गुलटेकडी १३.५), भूमी चव्हाण (एसपीएम पब्लिक, टिळक रस्ता १३.७), अनुशा फडतरे (अभिनव विद्यालय, एरंडवणे १३.९).
१०० मीटर धावणे ः १४ ते १६ वर्षे मुले - शिवराज काळे (सिंबायोसिस, प्रभात रस्ता ११.७ सेकंद), सार्थक कुंजीर (एंजेल हायस्कूल, उरुळी कांचन ११.९), जॉय मोमीन (नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे सैनिकी, फुलगाव १२.३). मुली - आश्वी टकले (एसपीएम पब्लिक, १३.३), केतकी कुंटे (ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ १३.८), तन्वी ओतूरकर (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव १४.८).
३०० मीटर धावणे ः १० ते १२ वर्षे मुले - दिलास्तो नगाडोंग (लोकसेवा इंग्लिश, फुलगाव ४५.५ सेकंद), साई थोरात (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ४८.२), आरुष दिघे (भारतीय विद्या भवन, ४८.५). मुली - आराध्या गायकवाड (अहिल्यादेवी हायस्कूल, ४८.३), अर्णवी पुजारी (एसपीएम पब्लिक, ५०.८), केसर उत्तम (ज्ञानवर्धिनी इंग्लिश, हडपसर ५१.४).
४०० मीटर धावणे ः १२ ते १४ वर्षे मुले - दीप गुजराथी (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ६०.७ सेकंद), शिवतेज गायकवाड (केंद्रीय विद्यालय, गिरीनगर ६१), युवराज ढेबे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव ६१.३). मुली - अनुशा फडतरे (अभिनव विद्यालय, ६६.२), अधिरा पवार (माऊंट कार्मेल, लुल्लानगर,
६७.२), आर्या कदम (माऊंट कार्मेल, लुल्लानगर ६८.१). १४ ते १६ वर्षे मुले - नील आपटे (सिंबायोसिस, प्रभात रस्ता ५३ सेकंद), आरेन सेल्वराज (डॉन बॉस्को, हायस्कूल, येरवडा ५३.३), क्षितीज शिंदे (सिंबायोसिस, प्रभात रस्ता ५६.१).
६०० मीटर धावणे ः १२ ते १४ वर्षे मुले - युवराज ढेबे (सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव, १ मि.४३.८ से.), बालाजी उबाळे (ज्ञानगंगा विश्व, शिरूर, १.४४.३), शंभूराज बाणखेले (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी १.४४.७). मुली - आर्या डोके (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी १.५४.९), दिशाली नहार (आचार्य श्री विजय वल्लभ, भवानी पेठ १.५६.०), अर्वा स्वामी (बाल शिक्षण मंदिर १.५७.०). १५०० मीटर धावणे ः १४ ते १६ वर्षे मुले - कार्तिक कावबले (सेंट तेरेसा, लोणी काळभोर ५ मि.१५.० से.), विराज राणा (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर ५.२२.०), अभिनव सिंग (एसपीएम पब्लिक, ५.२३.८). मुली - अर्शिता पवार (माऊंट कार्मेल, ५.३७.४), अवंती डिंबळे (सरदार दस्तूर, ६.१९.६), स्वातिका उनगाड (लोकसेवा इंग्लिश, ६.२३.४).
PNE24U70489, PNE24U70490

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

Photos : अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये हाहाकार! अंतराळातून काढलेली छायाचित्रे सांगतात सत्य, नासाने जारी केले धक्कादायक 10 फोटो

SCROLL FOR NEXT