पिंपरी, ता. ११ ः देशातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन बुधवारपासून (ता. ११) मोशी (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात सुरू झाले. त्याचे उद्घाटन प्रदर्शनस्थळी आलेल्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते हवेत फुगे सोडून झाले. रविवारपर्यंत (ता. १५) प्रदर्शन सुरू राहणार आहे.
किसान कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक सहभागी झाले आहेत. शेतातील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, रोपवाटिका, शेती लघू उद्योग अशी विभागवार दालने आहेत. प्रत्येक दालनात शेतकऱ्यांना माहिती देण्याची व्यवस्था आहे. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर ‘ॲप’द्वारे नावनोंदणीची सोय आहे. प्रदर्शनात सहभागी कंपन्यांच्या उत्पादनांची डिजिटल यादी ‘किसान अॅप’वर आहे. शेतकरी घरबसल्या विविध उत्पादनांविषयी माहिती मिळवू शकतात. संबंधित व्हिडिओ पाहू शकतात. प्रत्यक्ष प्रदर्शनात येण्यापूर्वी ‘अॅप’च्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधू शकतात.
उल्लेखनीय ‘मातीमोल’
मातीच्या आरोग्याचे महत्त्व सांगणारा मातीमोल उपक्रम असून, आपली माती जिवंत आहे की नाही यावर चर्चा करणे, मातीच्या आरोग्याविषयी शेतकरी समुदायामध्ये जागरूकता वाढवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. ‘चला आपल्या मातीची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया, अर्थात मातीमोल जाणूया,’ हा उपक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केला आहे. तसेच, बिझनेस लाउंजच्या माध्यमातून शेतीशी संबंधित व्यावसायिकांना एकत्र येऊन परस्पर संवाद, सहयोग किंवा भागीदारींसाठी प्रोत्साहन मिळेल.
फोटोः 0553
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.