पिंपरी-चिंचवड

घरकूलमधील सदनिका भाड्याने देण्याचे टाळावे अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांचे लाभार्थ्यांना आवाहन

CD

पिंपरी, ता. १२ ः ‘‘चिखली येथील घरांचा ताबा मिळणार असलेल्या लाभार्थ्यांनी सदनिकांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. या सदनिकांचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करावा, तसेच सदनिका भाड्याने देणे, इतरांना वापरासाठी देणे असे प्रकार टाळावेत,’’ असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी लाभार्थ्यांना केले.
केंद्र व राज्य शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत गोरगरिबांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी चिखली येथील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील १७८ व्या इमारतीमधील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते काढली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत असते. ग्रामीण भागातून शहरात कामासाठी स्थायी झालेल्या नागरिकांना भाड्याने किंवा झोपडपट्टी परिसरात राहावे लागते. परंतु भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना भरमसाठ प्रमाणात भाडे भरावे लागत असल्याने स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देत असून, त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यास मदत होत आहे.’’
घरकुल योजनेच्या माध्यमातून सदनिका वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सदनिकांमध्ये आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या सदनिकांचा वापर स्वतः करून सदनिकांमध्ये आणि सदनिकांच्या भोवताली स्वच्छता राखावी, असे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT