पिंपरी-चिंचवड

कासारसाई धरण परिसरात रस्त्याची दुरवस्था

CD

सोमाटणे, ता. १३ ः कासारसाई धरण ते केदारीवस्ती (कुसगाव) रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कासारसाई धरणालगत आणि केदारी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची नियमित दुरुस्ती न केल्याने सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली. पावसाने रस्त्यावरील खडी, डांबर उखडले असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरणाखाली खडी उखडून रस्त्यावर साठल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हा रस्ता केदारीवस्तीसह कासारसाई धरणावरील बोटिंग क्लब, फिल्म सिटी, कृषी पर्यटन केंद्राला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यातच दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक कासारसाई धरणावर फिरण्यासाठी येतात. त्यांनाही या खराब रस्त्यावरील खड्डे व खडी पार करून जावे लागते. यातून अनेक पर्यटकांच्या मोटारसायकली घसरून पडण्याच्या घटना नियमित घडतात.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी बाळासाहेब केदारी, बाळासाहेब गायकवाड, युवराज केदारी, उमेश केदारी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इराणी जहाजावर पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात १०१ जण बेपत्ता, ७८ जण जखमी

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT