पिंपरी-चिंचवड

महावाचन उत्सवात विद्यार्थ्यांचा एल्गार पिंपरी चिंचवड शहरातील ८ हजार विद्यार्थी सहभागी

CD

पिंपरी, ता. १३ ः शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या महावाचन उत्सवाला शहरात विद्यार्थ्याचा चांगला प्रतिसाद लाभला. या उत्सवात शहरातील ७ हजार ९९४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सध्याचे विद्यार्थी मोबाईलमध्ये पूर्णपणे अडकून पडल्याने वाचनाकडे त्यांचा कल अजिबात नसल्याचे वारंवार समोर येत आहे. स्मार्टफोनच्या प्रभावामुळे आणि खास करून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्टफोन आल्याने वाचनाकडे विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. अशावेळी त्यांना पुन्हा पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘महावाचन उत्सव’ या उपक्रमाची सुरवात केली आहे. या वर्षी या उपक्रमात ७ हजार ९९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील तिसरी ते बारावीतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात आले होते. पिंपरी विभागांर्तगत १,२२,०३० विद्यार्थ्यांपैकी ३, १६७ (२.६०) तर आकुर्डी विभागांर्तगत १,८४,६७० विद्यार्थ्यांपैकी ४,८२७ (२.६१) विद्यार्थ्यांनी प्रत्‍यक्षात वाचनात सहभाग नोंदवला आहे.


सारांश लिहिणाऱ्यांचा गौरव
या मोहिमेत विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारे कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहायचा आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ५० ते ६० शब्दांत, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ८० ते १०० शब्दांत आणि आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी १०० ते १५० शब्दांत हा सारांश लिहिणे अपेक्षित आहे. हा उत्सव शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पार पडला आहे. प्रत्येक स्तरावर तीन सर्वोत्तम सारांश लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात येणार आहे.


पुणे जिल्ह्‍यात १९.१८ टक्के
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील शाळांमधील १६,७८,६३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ‘महावाचन’ उत्सवात ३,२१,९७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे उपलब्ध आकडेवारीतून समोर दिसत आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यात १९.१८ टक्के विद्यार्थ्यांनी वाचन केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

आकडे बोलतात
तालुकास्तर ः एकूण विद्यार्थी - सहभागी विद्यार्थी -एकूण टक्केवारी

-पुणे जिल्‍हा परिषदांतर्गत शाळा - ८९५९६२ - १५८६९२ - १७.७१ टक्के

-पुणे महापालिका अखत्यारित शाळा - ४७५९७२ - १५५२८७० - ३२.६३ टक्के

-पिंपरी चिंचवड महापालिका अखत्यारित शाळा -३०६७००- ७९९४ - २.६१ टक्के


कोट
‘‘वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविला आहे. अनेक शाळांनी सहभाग घेतलेला आहे. परंतु महावाचन उत्सव उपक्रमात अनेक शाळांनी सहभाग घेतला आहे. मुलांमध्ये वाचनाला पसंती मिळत आहे.’’
-संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

फोटोः 71049, 71052

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT