पिंपरी, ता. १३ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. १६ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येईल. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून, विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.