पिंपरी-चिंचवड

इगल इन्फ्रा, डी.वाय.पाटील सीसी, कपिल सन्स ग्रुपची विजयी सलामी

CD

पुणे, ता.१३ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि सकाळ माध्यम समूहाच्यावतीने, पुणे येथे आयोजित रॅकेट रिपब्लिक कपिल सन्स ग्रुप प्रस्तुत ‘एमसीए कॉर्पोरेट शिल्ड’ क्रिकेट महासंग्रामाला शुक्रवार (ता.१३) पासून शानदार सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी इगल इन्फ्रा, डी.वाय.पाटील सीसी आणि कपिल सन्स ग्रुप या संघांनी विजयी सलामी दिली. इगल इन्फ्राचा सलामीवीर हर्ष संघवी याची धडाकेबाज १४० धावा तसेच डी.वाय.पाटील सीसीचा मुर्तझा ट्रंकवाला याने सुरेख शतक झळकाविले.
राज्यातील क्रिकेटपटूंना एकदिवसीय सामन्यांच्या तयारीसाठी स्पर्धात्मक व्यासपीठ तसेच आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने एमसीएच्या गहुंजे येथील स्टेडियम आणि डेक्कन जिमखाना येथे वरील स्पर्धा भरविण्यात आली आहे.
गहुंजे येथील सामन्यात इगल इन्फ्रा विरुध्द पुणेरी बाप्पा हा सामना अतिशय चुरशीचा झाला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारलेल्या पुणेरी बाप्पाला पहिले यश लगेचच मिळाले. मात्र, त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल होत गेली. इगल इन्फ्राकडून हर्ष संघवी याने तब्बल नऊ षटकार व नऊ चौकारांसह नव्वद चेंडूत १४० धावांची धडाकेबाज खेळी केली. यष्टिरक्षक मंदार भंडारी याने ६६ धावा करत त्याला सुरेख साथ दिली. त्या जोरावर इगल इन्फ्राने तब्बल ३७२ धावांचा डोंगर रचला. या आव्हानात्मक धावसंख्येला उत्तर देताना पुणेरी बाप्पाचा डाव ३५७ धावसंख्येवर आटोपला. आर्यन देसाई (५७ धावा), ऋषिकेश सोनावणे (८३ धावा), यश क्षीरसागर (७० धावा) यांनी दिलेली कडवी झुंज पुणेरी बाप्पाचा विजय साकारण्यास अपुरी पडली. रवींद्र जाधव, मनोज इंगळे यांनी अनुक्रमे ३ व २ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. इगल इन्फ्राच्या हर्ष संघवी याला सामन्याचा मानकरी म्हणून बहुमान मिळाला.
गहुंजेच्या मुख्य मैदानावर झालेल्या डी.वाय.पाटील क्रिकेट क्लब विरुद्ध सुराणा ॲण्ड बोथरा या दुसऱ्या सामन्यात डी.वाय. पाटील क्रिकेट सेंटरने प्रतिस्पर्धी संघावर १६८ धावांनी मोठा विजय साकारला. डी.वाय. पाटीलच्या मुर्तजा ट्रंकवाला याने सलामीला येत १०५ धावांत १०१ धावांची खेळी साकारली. त्याला विशांत मोरे याने (७० धावा) तर यश नहार याने (४९ धावा) करत मोलाची साथ दिली. या जोरावर डी.वाय.पाटील क्रिकेट क्लबने ३७४ अशी भली मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना सुराणा ॲण्ड बोथरा संघाचे फलंदाज नियमितपणे बाद होत गेले. ओम भोसले याची ६९ चेंडूंतील ८९ धावांची खेळी संघाचा विजय साकारण्यात अपुरी पडली. सुराणा ॲण्ड बोथरा संघाचा डाव अवघ्या २०६ धावसंख्येवर आटोपला. डी.वाय. पाटीलच्या एस.चव्हाण याने अवघ्या ३४ धावात ६ बळी टिपले. याच कामगिरीच्या जोरावर संघाने सामना जिंकला. त्यालाच सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
डेक्कन जिमखान्याच्या मैदानावरील तिसरा सामना जेटस विरुध्द कपिल ॲण्ड सन्स यांच्यात रंगला. कपिल ॲण्ड सन्स ग्रुप संघाने प्रथम फलंदाजी करताना २३० अशी माफक धावसंख्या उभारली. प्रीतम पाटील, निखिल नाइक यांनी अनुक्रमे ५६, ६४ धावा करत विशेष चमक दाखवली. कपिल ॲण्ड सन्स ग्रुपकडून रजनीश कुर्बानी, तनय संघवी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या धावसंख्यास उत्तर देताना कपिल ॲण्ड सन्स ग्रुपने २३२ धावा करत विजयाची मोहोर उमटवली. सिध्देश वीर, दिग्विजय पाटील यांनी अनुक्रमे ६६ व ५१ धावा फटकावत विजयाचा मोलाचा हातभार लावला. जेटसकडून सत्यजीत बच्छाव याने गोलंदाजीत दोन बळी घेतले.

PNE24U71175, PNE24U71178, PNE24U71236, PNE24U71209, PNE24U71205, PNE24U71213

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Bhandara Accident: सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्याचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू; खानावळीत जेवण करून दुचाकीवरून घरी निघाले अन्..

Kolhapur MPSC Candidate :भावी अधिकाऱ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित, यादी प्रसिद्ध न झाल्याने अस्वस्थता

SCROLL FOR NEXT