पिंपरी-चिंचवड

धमाकेदार आतषबाजीसह ईगल इन्फ्रा, जेटसची उपांत्य फेरीत धडक धमाकेदार आतषबाजीसह ईगल इन्फ्रा, जेटसची उपांत्य फेरीत धडक

CD

पुणे, ता. १९ ः रॅकेट रिपब्लिक कपिल सन्स ग्रुप प्रस्तुत ‘एमसीए कॉर्पोरेट शिल्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ईगल इन्फ्रा आणि जेटस संघांतील धमाकेदार सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांकडून एकूण सातशेपेक्षा अधिक धावा बरसल्या. अनिकेत पोरवाल, अभिनव तिवारी यांनी शतके झळकाविली. या दोन्ही संघांसह कपिल ॲण्ड सन्स ग्रुप आणि पुणेरी बाप्पा या संघांनी गुरुवारी (ता.१९) उपांत्य फेरीत धडक मारली. शनिवारी (ता.२१) या चार संघांमध्ये आता उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे आणि डेक्कन जिमखाना येथील मैदानांवर वरील स्पर्धा भरविण्यात आली आहे. डेक्कन जिमखानाच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात सुराणा ॲण्ड बोथरा संघाने पुणेरी बाप्पाचा ४ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुराणा ॲण्ड बोथरा संघास फायदेशीर ठरला. फिरकी गोलंदाजीला खेळपट्टी चांगलीच साहाय्य करत असल्याने पुणेरी बाप्पाच्या फलंदाजांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. धावगती वाढविण्याच्या नादात पुणेरी बाप्पाचे फलंदाज हे नियमित अंतराने व निर्णायक क्षणी बाद होत गेले. ऋषिकेश सोनवणे याने ५६ चेंडूंत ५२ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नजरेत भरला तो तळाचा फलंदाज शुभम कोठारी. त्याने आठव्या क्रमांकावर येत ३६ चेंडूत ३७ धावा करत साकरलेली झुंजार खेळी लक्षवेधी ठरली.
पुणेरी बाप्पाच्या २२१ धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुराणा ॲण्ड बोथरा संघाच्या सलामीवीरांनी वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिल्याच षटकात त्यांचा फलंदाज तंबूत परतला. त्याचा चांगलाच दबाव इतर फलंदाजांवर आला. संघाचे पाच फलंदाज अत्यंत स्वस्तात तंबूत परतले. मात्र, शुभम नवले याने ७४ चेंडूंत नाबाद ७० धावा तर आनंद ठेंगे याने २९ चेंडूंत झटपट केलेल्या नाबाद ५४ धावांमुळे सुराणा ॲण्ड बोथरा संघाने अवघ्या ३०.२ षटकांत विजय मिळविला. सुराणा ॲण्ड बोथराचा अष्टपैलू खेळाडू आनंद ठेंगे (३ बळी आणि नाबाद ५४ धावा) याला सामनावीराचा बहुमान मिळाला.

एमसीएच्या गहुंजे येथील मैदान क्रमांक दोनवरील दुसऱ्या सामन्यात डी.वाय.पाटील सीसीने कपिल ॲण्ड सन्स ग्रुपचा १०६ धावांनी दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून डी.वाय.पाटील सीसी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली.
सलामीवीर यश नहार आणि संघाचा भरवशाचा फलंदाज मुर्तझा ट्रंकवाला हे अपयशी ठरले. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर चांगलाच दबाव आला. संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. सिद्धार्थ म्हात्रे याने १०० चेंडूत ८० धावा फटकावल्या. त्याला विशांत मोरे, प्रणव सिंग यांनी मोलाची साथ दिली. याच जोरावर संघाला २५६ अशी धावसंख्या उभारली.
मैदानात फलंदाजीस उतरलेल्या कपिल ॲण्ड सन्स ग्रुपला हे माफक धावसंख्येचे आव्हान पेललेच नाही. सिद्धार्थ म्हात्रे याने गोलंदाजीतही कमाल करताना अतिशय तिखट मारा केला. त्यात कपिल ॲण्ड सन्स ग्रुपची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. त्याने २५ धावांत ५ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
कपिल ॲण्ड सन्स ग्रुपकडून मेहुल पटेल, ऋषभ राठोड यांनी संघाचा पराभव लांबविला. मात्र, अखेर ३५ व्या षटकात १५० धावसंख्येवर कपिल ॲण्ड सन्स ग्रुपचा डाव संपुष्टात आला. डी.वाय.पाटील सीसी संघाचा अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
गहुंजे येथील मुख्य मैदानावरील तिसऱ्या सामन्यात ईगल इन्फ्रा आणि जेट्स या दोन्ही संघांनी तब्ब्ल ७३९ धावांचा पाऊस पाडला. नाणेफेक जिंकून जेट्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. गोलंदाजीला पोषक नसलेल्या या पाटा खेळपट्टीवर इगल इन्फ्रा फलंदाजांनी जेट्सच्या गोलंदाजीची धूळधाण उडवली.
अनिकेत पोरवाल याने ८७ चेंडूत १०० धावा करत जोरदार शतक ठोकले. त्याला नौशाद शेख ५४ धावांत ६९ धावा, अद्वय सिधये ६२ चेंडूंत ६९ धावा आणि हर्ष संघवी याने ३१ चेंडूंत ४१ धावा करत मोलाची साथ दिली. ईगल इन्फ्राने या सामन्यात ५० षटकांत ४०३ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. अशक्य प्राय वाटणाऱ्या या धावसंख्येचा पाठलाग करताना जेट्स हे आव्हान कसे पार करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, सामना एकतर्फी होईल असे वाटत असताना जेट्सच्या झुंजार फलंदाजीने चांगलीच रंगत आणली. अत्यंत चिवट फलंदाजी करत त्यांनी ५० षटकांत ३३६ असे उत्तर दिले. जेट्सकडून अभिमान तिवारी याने १०६ चेंडूंत झुंजार शतक
ठोकले. धीरज फटांगरे याने ७४ चेंडूंत ७२ धावा व यश जाधव याने ६३ चेंडूंत ६६ धावा करत सामन्यात रंगत आणली.
मात्र, आवश्यक ती धावगती राखता न आल्यामुळे जेट्सचा डाव निर्धारित ५० षटकांत ३३६ धावांवर रोखला गेला.
ईगल इन्फ्राचा अनिकेत पोरवाल यास सामनावीराचा किताब मिळाला.


विजय मिळूनही उपांत्य फेरी दूर
उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी पुणेरी बाप्पा संघाने दिलेले २२१ धावसंख्येचे आव्हान सुराणा ॲण्ड बोथरा संघास २०.५ षटकांत पार करायचे होते. मात्र, हे लक्ष्य गाठताना सुराणा ॲण्ड बोथरा संघाचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यामुळे, हे आव्हान गाठणे अशक्य प्राय ठरल्याने संघाने निर्धारित षटके खेळून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये संघाने विजय मिळविला. डी.वाय.पाटील सीसी संघानेही कपिल ॲण्ड सन्सवर दमदार विजय मिळविला. मात्र, संघ उपांत्य फेरीपासून दूर राहिला. तर एकमेकांविरुद्ध खेळलेले ईगल इन्फ्रा आणि जेटस संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

संक्षिप्त धावफलक
डी.वाय.पाटील सीसी ः ५० षटकांत ९ बाद २५६ - सिद्धार्थ म्हात्रे ८०, विशांत मोरे ४४, प्रणय सिंग ३१ (स्नेहल खामणकर २-५१, नदीम शेख २-४९, तनय संघवी २-३८, साव्या गजराज २-५५) १०६ धावांनी विजयी वि. कपिल ॲण्ड सन्स ग्रुप ः ३५ षटकांत सर्वबाद १५० - मेहुल पटेल ३७ (सिद्धार्थ म्हात्रे ५-२५, सिद्धेश वरघंटे २-२१).

पुणेरी बाप्पा ः ४५.३ षटकांत सर्वबाद २२१ - ऋषिकेश सोनवणे ५२, पवन शाह ४५, शुभम कोठारी ३७ (आनंद ठेंगे ३-४०, दीपक डांगी ३-२६, शुभम माने ३-२८) ४ गडी राखून पराभूत वि. सुराणा ॲण्ड बोथरा ः ३०.२ षटकांत ६ बाद २२४ - सौरभ नवले नाबाद ७०, आनंद ठेंगे नाबाद ५४, दीपक डांगी ३८ (शुभम कोठारी ३-६५, इजहान सईद २-३३)

ईगल इन्फ्रा ः ५० षटकांत ७ बाद ४०३ - अनिकेत पोरवाल १००, अद्वय शिधये ६९, नौशाद शेख ६९, हर्ष संघवी ४१ (साहिल चुरी ३-१०६, प्रथमेश गावडे २- ३५) ६७ धावांनी विजयी वि. जेटस ः ५० षटकांत ५ बाद ३३६ - अभिनव तिवारी ११४, धीरज फटांगरे ७२, यश जाधव ६६ (मनोज इंगळे २-८७).

PNE24U72915, PNE24U72913, PNE24U72995, PNE24U72997

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT