Ashadhi Wari 2024  sakal
पिंपरी-चिंचवड

Ashadhi Wari 2024 : देहू, आळंदीत वारीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी;सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (ता. २७) आळंदी व देहू येथे भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच बंदोबस्ताबाबत सूचना केल्या.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (ता. २७) आळंदी व देहू येथे भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच बंदोबस्ताबाबत सूचना केल्या. यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, माधुरी कांगणे, बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, सचिन हिरे, राजेंद्रसिंग गौर, देविदास घेवारे आदी उपस्थित होते.

दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या मोबाईल, रोखरक्कम, दागिन्यांचे भान राहत नाही. याचाच फायदा घेऊन चोरटे अलगद दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरून नेतात. मागील वर्षी असे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यावर्षी पालखीला व मार्गावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
खाकी वर्दीत, साध्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत देखील पोलिस पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पायी वारीदरम्यान सोनसाखळी चोरी, खिसे कापण्याचे प्रकार यावर नजर ठेवण्यात येत आहे.

साध्या वेशातील ‘वॉचर’
पालखी सोहळ्यात विविध जिल्ह्यातील चोरटे सहभागी होतात. वारी दरम्यान चोऱ्या करतात. यंदा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच मागील वर्षी ज्या भागातील गुन्हेगारांनी पालखी सोहळ्यात गुन्हे केले. त्या भागातील अनुभवी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके पालखी सोहळ्यासाठी मागवली आहेत. ही पथके आपापल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉचर’ बनून नजर ठेवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT