पिंपरी-चिंचवड

कायदे बदलाबाबत पोलिसांना प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. २ : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे सोमवारपासून (१ जुलै) कालबाह्य झाले असून त्यांच्या जागी तीन कायदे लागू झाले आहेत. या कायद्याच्या बदलाबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भारतीय दंड संहितेतील कलम जवळपास तोंडपाठ झाले आहेत. परंतु, आता नवीन कायद्यातील कलमांचा क्रम व त्यातील कायदेशीर तरतुदी स्मरणात राहण्यासाठी त्याचे सतत वाचन करणे आवश्यक आहे. या नव्या कायद्यातील शिक्षा व तरतुदींचाही पोलिसांना अभ्यास करावा लागणार आहे.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. तर भारतीय दंड संहिता (आयपीसी), द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य झाले आहेत. दरम्यान, नवीन कायद्यांची माहिती होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दोन टप्प्यांत प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात निगडी येथील मुख्यालयात सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथील विधी निर्देशक पौर्णिमा नाईक व संजय पाटील यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस उपायुक्त यांनी परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यातील अंमलदारांना प्रशिक्षण दिले. मागील काही दिवसांपासून मुख्यालय तसेच पोलिस ठाणे येथे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर पोलिस उपायुक्त यांना पुण्यातील पोलिस संशोधन केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT