पिंपरी-चिंचवड

पीएमआरडीएत बैठकांचे सत्र सुरू

CD

पिंपरी, ता. २ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी नुकतीच आयुक्त योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासनाचा कारभार हाती घेताच नवीन आयुक्तांनी विविध विभागांच्या बैठकांचे नियोजन सुरू केले आहे. सलग तीन दिवस या बैठकांद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या सुरू असलेले प्रकल्प आणि रखडलेले प्रकल्प यांचीही माहिती घेतली जाणार आहे.
पीएमआरडीएच्या आयुक्तपदाचा कार्यभार म्हसे यांनी नुकताच हाती घेतला आहे. त्यानंतर, कामकाजाचा आढावा घेऊन विविध प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार, प्रशासन, लेखा, जमीन व मालमत्ता आदी विभागांच्या बैठका ते घेणार आहेत. तर बुधवार आणि गुरुवारी अतिक्रमण, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह विभाग आदींच्या बैठका होणार आहेत. सध्या सुरू असलेली कामे, प्रस्तावित कामे, कोणत्या कामांना गती देता येईल, याचा आढावा त्यानिमित्त घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आठ आस्थापनांवर 'एफडीए'चा बडगा, पाच परवाने निलंबित; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन

Sharad Koli : ठाकरे गटाला मोठा धक्का! शरद कोळी 1 वर्षासाठी येरवाड्यात; नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

भांडकुदळ की स्पष्टवक्ते? समोर बॉस असो की नेता; थेट भिडतात 'या' मूलांकाचे लोक!  अंकशास्त्रानुसार जाणून घ्या बेधडक स्वभावाचे रहस्य...

Marathi News Live Updates: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत बंडखोरी राष्ट्रवादीचे शिवाजी खांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT