पिंपरी-चिंचवड

आर्थिक व्यवहारावरून तरुणाला बेदम मारहाण

CD

पिंपरी : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना चऱ्होली येथे घडली. याप्रकरणी सचिन राजेंद्र नावडकर (रा. आळंदी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज ऊर्फ सोन्या रामदास घुले (वय ३२, रा. देहूफाटा) व त्याचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर तुझा कार्यक्रम करतो अशी धमकी दिली.

कंपनीचे शटर उचकटून ऐवज चोरीला
चिखली : कंपनीचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने सव्वा लाखांची रोकड व सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरले. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली. याप्रकरणी मुन्नू रामबचन यादव (रा. अंगणवाडी रोड, मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची शाडो फॅक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून या कंपनीचे शटर चोरट्याने उचकटले. आत शिरल्यानंतर कंपनीतील लॉकरमधील एक लाख १९ हजार २४४ रुपयांची रोकड व कंपनीतील सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेले.

एटीएम कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
मोशी : ज्येष्ठ नागरिकाची मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डने दुसऱ्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. हा प्रकार मोशीतील तुपेवस्ती येथे घडला. याप्रकरणी धोंडिराम मारुती शिवशरण (रा. तुपे वस्ती, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मोशी येथील एमटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. दरम्यान, त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला मदत करण्याच्या खोट्या बहाण्याने फिर्यादीच्या एटीएमचा पासवर्ड पहिला. त्यानंतर नकळत फिर्यादी यांचे एटीएम कार्ड बदलून घेऊन गेला. परस्पर एटीएम कार्ड वापरून दुसऱ्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.

सात लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार
भोसरी : सात लाखांच्या रकमेची बॅग दुचाकीला अडकविलेली असताना दोन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाचे लक्ष विचलित करून बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाले. हा प्रकार भोसरी, लांडेवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर घडला. याप्रकरणी दत्तात्रेय चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर, भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी घराच्या बांधकामासाठी बँकेतून सात लाखांची रोख रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी दुचाकीच्या हँडेलला अडकून ठेवली होती. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे पैसे खाली पडल्याचे सांगून फिर्यादीचे लक्ष विचलित केले. दरम्यान, फिर्यादीची पैशांची व कागदपत्रांची बॅग घेऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

महिलेचा ४७ हजारांचा ऐवज लंपास
पिंपरी : बसमध्ये बसताना महिलेकडील ४७ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना कासारवाडीतील नाशिक फाटा येथे घडली. याप्रकरणी संगीता शिरीष बाविस्कर (रा. गंगापूर रोड, सौभाग्यनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या बसमध्ये बसत असताना आरोपीने त्यांचे सोन्याचे दागिने, अडीच हजारांची रोकड व मोबाईल असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT