पिंपरी-चिंचवड

डेंगीचे पाच रुग्ण आढळले

CD

पिंपरी,ता. २ ः पावसाळ्याला सुरुवात होताच डेंगीने डोके वर काढले असून शहरात मंगळवारपर्यंत (ता.२) डेंगीचे एकूण पाच रुग्ण आढळून आले. सोमवारी (ता.१) एकाच दिवशी दोन रुग्णांची नोंद झाली. त्यातील एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून इतर चार रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने देण्यात आली.
डेंगीचा आजार एडिस इजिप्ती या नावाचा डास चावल्यामुळे होतो. या डासांची उत्पत्ती आजूबाजूला साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे पाण्याची भांडी वेळोवेळी स्वच्छ करावीत. कुलर, फ्रीज, फ्लॉवर पॉट यातील पाणी बदलावे. तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. डेंगीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

डेंगीची लक्षणे
- तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी
- उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे
- अंगावर पुरळ उठणे, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे
- रक्ताची उलटी होणे, नाकातून रक्तस्राव होणे

हे करा
- ताप आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
- भरपूर द्रव पदार्थ व पॅरासिटमॉल घ्या
- घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका
- तुटलेली भांडी, जुने टायर, रद्दी यांची विल्हेवाट लावा
- डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय चाचणी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

SCROLL FOR NEXT