पिंपरी-चिंचवड

तीन चाकी ई-वाहनांसाठी दिव्यांगांना अर्थसहाय्य

CD

पिंपरी, ता. ३ ः दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने योजना आखली आहे. त्यानुसार, दिव्यांगांना फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजे तीन चाकी ई-वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत, दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत शहरातील दिव्यांग व्यक्तींना फिरत्या तीन चाकी ई-वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

योजनेचा लाभ घेण्यासाठी...
लाभार्थींनी www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी, शर्ती आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये या योजनेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृती उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.

लाभार्थींसाठी नियम-अटी
- दिव्यांग लाभार्थीचे किमान तीन वर्षे शहरात वास्तव्य असावे
- लाभार्थीचे नाव असलेले स्वतःची किंवा कुटुंबाची शिधापत्रिका असावी
- पासपोर्ट, स्वतः किंवा पालकांच्या नावे असलेली मिळकतकर पावती किंवा वीज बिल
- ऑनलाइन अर्ज भरताना लाभार्थीचे मूळ आधारकार्ड, मतदार ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक
- लाभार्थीचे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे युडीआयडी कार्ड अपलोड करणे आवश्यक
- लाभार्थीचा वाहन चालविण्याचा परवाना अपलोड करणे आवश्यक
- लाभार्थीचे हॉकर्स प्रमाणपत्र किंवा हॉकर्स सर्व्हेमध्ये नोंद असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक
- दिव्यांग लाभार्थीने संबंधित दुकानदाराकडील ई-वाहनाचे मूळ कोटेशन अपलोड करणे आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT