पिंपरी-चिंचवड

पिंपरी महापालिकेचे कामकाज मराठीतून

CD

पिंपरी, ता. ४ ः महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व प्रशासकीय कामकाजात तसेच व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व कामकाज मराठी भाषेत होईल, याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर सक्षमपणे व्हावा, यासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती, दूरध्वनीवर बोलणे, जनतेशी पत्रव्यवहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सभेतील भाषण, अधिकारी व कर्मचारी यांची स्वाक्षरी मराठी भाषेत असणे बंधनकारक असणार आहे.
महापालिकेमार्फत नागरिकांपर्यंत जाणारे नमुने, पत्रके, परवाने, प्रपत्र, नियमपुस्तिका, सर्व प्रकारच्या टिप्पण्या, नस्त्या, शेरे, अभिप्राय, धोरणे, आदेश, अधिसूचना, प्रारूप नियम, अहवाल, निमंत्रण पत्रिका, निविदा, बैठकांचे कार्यवृत्त, कार्यालयातील नामफलक तसेच संकेतस्थळ आदी मराठी भाषेत असणे आवश्यक असणार आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणारी माहिती तसेच राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर विभागाची माहिती सर्वांच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्यास अशी माहिती मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रसिद्ध करण्यात यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT