पिंपरी-चिंचवड

यंदा शालेय क्रीडा स्पर्धेत ९३ खेळांचा समावेश

CD

पिंपरी, ता. ५ ः शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यंदा ९३ खेळांचा समावेश राहणार आहे. क्रीडा शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या अडी-अडचणी असल्यास त्या सोडविल्या जातील, अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी शुक्रवारी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने, पिंपरीतील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांची बैठक बोलाविण्यात आली. त्याबैठकीत बोलताना कसगावडे यांनी वरील ग्वाही दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) पंकज पाटील, प्रशासकीय अधिकारी (क्रीडा) परशुराम वाघमोडे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, तालुका क्रीडा अधिकारी सोनिया लुथरा, राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
कसगावडे यांनी खेळ सहभाग, शासकीय सोयी-सुविधा, अनुदान याबाबत मार्गदर्शन केले. विजयकुमार खरोटे यांनी अध्यक्षीय भाषणात खेळाडूंना भौतिक सुविधा देण्याबाबत आणि विद्यार्थी कलागुणांना वाव देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी काही क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. परशुराम वाघमोडे यांनी शासकीय स्पर्धेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. क्रीडा पर्यवेक्षक बन्सी आटवे, दीपक कन्हेरे, अरुण कडुस, रंगराव कारंडे, गोरक्ष तिकोने, बाळाराम शिंदे, जयश्री साळवे यांचे संयोजनासाठी सहकार्य लाभले.

- पुढील आठवड्याभरापासून स्पर्धेला सुरवात करण्याचे नियोजन
- सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेने होणार प्रारंभ
- अनुदानित खेळ ४९, उर्वरित विनाअनुदानित खेळांचा समावेश
- खेळांचे प्रवेश ऑनलाइन प्रवेश अर्ज घेतले जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT