पिंपरी-चिंचवड

नागरिकांच्या तक्रारींबाबत खुलासा करा निगडीतील सेतू कार्यालयाला तहसीलदारांची नोटीस

CD

पिंपरी, ता. ५ : विविध दाखल्‍यांसाठी आणि सरकारी योजनेच्या अनुषंगाने कागदपत्राच्‍या पूर्ततेसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यात सक्षमता दिसली नाही. सेतू कार्यालय दुपारीच बंद केले जात आहे. या बाबत नागरिकांच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून, त्वरित त्‍यावर खुलासा करावा, अशी नोटीस पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसील कार्यालयाच्‍यावतीने निगडी येथील सेतू कार्यालयाला दिली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्‍या आहेत.
निगडी येथील सेतू कार्यालयात दाखल्यांबाबत तसेच लाडकी बहीण योजनेवर योग्य कार्यवाही होत नसून, नागरिकांना वेळेत दाखले दिले जात नाहीत. या बाबत ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. ३) वृत्‍त प्रसिद्ध झाले आहे. त्‍याची दखल तहसील कार्यालयाकडून घेत सेतू कार्यालयाकडून खुलासा मागविला आहे.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रति महिना दीड हजार रुपयांची घोषणा केली आहे. त्यासंबंधी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला नागरी सुविधा केंद्र तसेच निगडीतील सेतू कार्यालयात येत आहेत. शहरातील विविध नागरी सुविधा केंद्रात रांगा लागत आहेत. या योजनेमुळे दाखले तसेच त्या संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची संख्या वाढली आहे. मात्र, निगडीतील सेतू कार्यालयाकडून संबंधित योजना आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे वेळेवर दिले जात नसल्याची तक्रारी प्राप्त झाल्‍या आहेत. दुसरीकडे, शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठी आवश्यक दाखले देखील पालकांना मिळत नाहीत. येथील कार्यालयाच्या तांत्रिक घोळामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्याचप्रमाणे नागरिकांशी व्यवस्थित बोलत नसल्याच्या तक्रारी देखील आल्या आहेत.
दाखल्‍यांचा घोळ, वारंवार बंद पडणारे सर्व्हर आणि कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा यामुळे अर्जदारांना अडचणी निर्माण होतात. दरम्यान, याप्रकरणी पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली असून, सेतू कार्यालय चालकाला नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने देखील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत अडवणूक अथवा दिरंगाई केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे या योजने संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, निगडी येथील सेतू कार्यालयातील प्रिंटर बंद पडल्याने नागरिकांची हाल झाले होते. त्यातच निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दाखल्‍यांबाबत व्यवस्थित माहीत नसल्याचे दिसून आले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित सेतू कार्यालय चालकास तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना विविध दाखले आणि योजना संबंधित सहकार्य करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

कोट :
नागरिकांच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. सेतू दुपारीच बंद केले जात असल्‍याचे सांगितले जात आहे. त्‍यामुळे अडचणी का येत आहेत, तसेच सेतू कार्यालय लवकर का बंद केले जात आहे, या बाबत खुलासा मागितला आहे.
- जयराज देशमुख, तहसीलदार, पिंपरी चिंचवड अप्‍पर तहसील कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT