पिंपरी-चिंचवड

फसवणूकप्रकरणी दोघांना अटक

CD

पिंपरी, ता. ५ : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून जास्त नफ्याचे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर सेलच्या पथकाने अटक केली.
सतीश सुरेश बुंदेले (रा. गोलांडे इस्टेट, लिंक रोड, चिंचवड), परेश गुलाब बिरदवडे (रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पोलिस अंमलदार सूरज शिंदे यांनी बुंदेले व बिरदवडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी कर्जत येथील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यातून त्या व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोघांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी वेगवेगळे बँक खाते सायबर फसवणूक करण्यासाठी उघडले असून, आरोपींनी उघडलेल्या खात्यांबाबत भारतातून ४० तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT