पिंपरी-चिंचवड

पिंपरीत व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

CD

पिंपरी, ता. ५ : कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
या प्रकरणी चंद्रशेखर किसन शिंदे (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपर्णा अशोक गिरी (रा. स्वामी विवेकानंद रोड, बिबवेवाडी, पुणे), धर्मा गोल्हार (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), नरेंद्र रमेशचंद्र सेंगर (मृत), आकाश नरेंद्र सेंगर (रा. बिग इंडिया चौक, सेक्टर नंबर २७, रा. प्राधिकरण, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना मीडिया आयडिया कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवले. मात्र, नंतर गुंतविलेल्या पैशांवर काहीही परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता फसवणुकीच्या दृष्टीने खोटी कागदपत्रे तयार केली.
फिर्यादी यांचे गुंतवणूक केलेले ५३ लाख १७ हजार रुपये तसेच या रकमेचे परताव्याचे ९० लाख अशी एक कोटी ४३ लाख १७ हजार रुपये परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच नरेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आकाश हे त्यांची कंपनी चालवीत असून, तोही पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT