पिंपरी-चिंचवड

विश्वचषकामध्ये अप्रतिम सांघिक कामगिरी

CD

पिंपरी, ता.६ ः ‘‘विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आपल्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीने विजेतेपदावर नाव कोरले. सूर्यकुमार यादव याने घेतलेला झेल निर्णायक ठरला. १९८३ च्या विश्वचषकात कपिल देव यांनी घेतलेल्या अप्रतिम झेलाची त्याने आठवण झाली,’’ असे कौतुकोद्‍गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी काढले.
थेरगाव येथील पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीला दिलीप वेंगसरकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयीही त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
वेंगसरकर म्हणाले,‘‘विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खूप छान राहिली. एकही सामना न गमावता आपण अंतिम सामन्यात धडक मारली. तेथेही सांघिक खेळाच्या जोरावर सुरेख पुनरागमन करत विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. संघातील सर्व खेळाडू आनंदी आणि एकमेकांना सहकार्य करताना दिसते. त्याचाच सकारात्मक परिणाम संघाचा कामगिरीवर झाला.’’
अंतिम सामन्यात यशस्वी जयस्वाल याला सलामीवीर म्हणून खेळायला संधी मिळेल, असे वाटत होते, असे सांगून वेंगसरकर म्हणाले,‘‘परंतु, विराट कोहली याने चांगली खेळी केली. तो मोठा खेळाडू आहे. जसप्रीत बुमराह याचीही गोलंदाजी अप्रतिम झाली. या प्रकारामधून रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली. खरे रोहित, विराट हे दोघे अजूनही खेळले असते. परंतु, संघाने सर्वोच्च कामगिरी केल्यावर किंवा योग्य वेळी निवृत्ती जाहीर करणे हे फार महत्त्वाचे असते. आणि ते त्यांनी केले. जडेजाही यानेही गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी केली.’’
राहुल द्रविड यांचेही कौतुक करताना वेंगसरकर म्हणाले,‘‘ विश्वचषक हा भारतीय संघाला खूप वर्षांपासून हुलकावणी देत होता. मात्र, यावेळी संघाने यश मिळविले. राहुल द्रविड प्रामाणिक आणि आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहे. त्याचीही प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी राहिली. योग्य कामगिरी करण्यासाठी उत्तम नियोजन कसे केले जाते, हे दिसून आले. या स्पर्धेनिमित्त हा एक चांगला पायंडा पडावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT