पिंपरी-चिंचवड

साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांची अकरा कर्मचाऱ्यांवर भिस्त

CD

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड शहरात साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचा कारभार शिधापत्रिका कार्यालयांतील केवळ ११ कर्मचाऱ्यांद्वारे होत आहे. तीन कार्यालयांतर्गत १७ मंजूर पदांपैकी सात पदे रिक्‍त आहेत.त्यातील निगडी आणि चिंचवड येथील कार्यालयांसाठी परिमंडळ अधिकारीच नियुक्‍त केलेले नाहीत. त्‍यामुळे, पुरवठा निरीक्षकांनाच परिमंडळ अधिकाऱ्यांचे काम पार पाडावे लागत आहे. परिणामी, नागरिकांना कामे मार्गी लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
नवीन शिधापत्रिका काढणे, दुबार शिधापत्रिका, नाव वाढविणे, कमी करणे आदींसह विविध कामांसाठी शिधापत्रिका कार्यालयात नागरिक गर्दी करत आहेत. शहरात निगडी, चिंचवड आणि भोसरी येथे शिधापत्रिका कार्यालयांचा समावेश आहे. या तीनही कार्यालयांतर्गत साडेतीन शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. या संख्येच्‍या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अपुरी आहे. निगडी आणि चिंचवड येथील शिधापत्रिका कार्यालयासाठी १२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन्‍ही कार्यालयांत सहा पदे भरलेली आहेत. त्यामध्ये, दोन पुरवठा निरिक्षक, एक लिपिक आणि तीन शिपाई आदींचा समावेश आहे. परंतु, दोन्‍ही कार्यालयांना परिमंडळ अधिकारी नियुक्‍त केलेला नाही. त्‍यामुळे, पुरवठा निरीक्षकांवरच परिमंडळ अधिकाऱ्यांचे काम करण्याची वेळ येत आहे. भोसरी येथील कार्यालयात एकूण पाच पदे मंजूर आहेत. यापैकी चार पदे भरलेली असून लिपिकाचे एक पद रिक्‍त आहे. रिक्‍त पदे भरण्याबाबत सातत्‍याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्याप रिक्‍त पदे भरण्यात आलेली नाहीत. ही पदे भरण्याची तीनही कार्यालयांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.

या समस्‍या निर्माण होतात...
- शिधापत्रिकांच्‍या कामांना गती नाही.
- धान्‍य वाटपाच्‍या तक्रारींकडे पुरवठा निरीक्षकांना लक्ष देता येईना
- स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांची तपासणी करणे अशक्य
- कामांसाठी सातत्‍याने हेलपाटे मारण्याची नागरिकांवर वेळ
- सध्याच्‍या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण

इतर कामांसाठीही नियुक्‍ती
शिधापत्रिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिधापत्रिका कामांव्‍यतिरिक्‍त इतरही कामे करावी लागत आहे. इथल्‍या कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामासाठी देखील नियुक्‍ती केले जाते. कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्‍याने शिधापत्रिका कार्यालयांतील सर्व कामे ठप्‍प होत आहेत.

एक लिपिक; दोन कार्यालये
निगडी आणि चिंचवड या शिधापत्रिका कार्यालयांसाठी प्रत्‍येकी दोन अशी लिपिकाची एकूण चार पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या केवळ एकाच लिपिकाचे पद भरलेले आहे. या एका लिपिकाला दोन्‍ही कार्यालयांत नियुक्‍ती दिली आहे. त्‍यामुळे, कामाचा मोठा भार त्याच्यावर येत असून कामेही अपूर्ण राहत आहेत.

पदांची आकडेवारी

कार्यालये / मंजूर पदे/ रिक्‍त पदे/ शिधापत्रिकाधारकांची संख्या
निगडी / ६ / ३/ एक लाख १० हजार २५
चिंचवड / ६ / ३ / एक लाख २२ हजार ६७९
भोसरी / ५ / १ / एक लाख पाच हजार ३३६


‘अ’ आणि ‘ज’ कार्यालयांचा कारभार एकाच कार्यालयातून सुरू आहे. या दोन्‍ही कार्यालयांत काही पदे रिक्त आहेत. ती भरण्याबाबत आमच्‍या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे.
- स्‍नेहल गायकवाड, पुरवठा निरिक्षक, ‘ज’ शिधापत्रिका कार्यालय, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT