पिंपरी-चिंचवड

शालेय खो-खो स्पर्धेमध्ये गेंदीबाई चोपडा विद्यालय विजेते

CD

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्‍हा क्रीडा परिषदेच्यावतीने, पूर्णानगर येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रीमती गेंदीबाई चोपडा विद्यालयाने विजेतेपद पटकाविले. तर श्री फत्तेचंद जैन विद्यालयाला उपविजेतेपद मिळाले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय मैदानावर वरील सामने झाले. स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी क्रीडा सभापती तुषार हिंगे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, स्पर्धा प्रमुख अरुण कडूस हे उपस्थित होते. सुनीता पालवे, कुमार कटके, रवींद्र गारगोटे, अंकुश सपकाळ यांचे स्पर्धेच्या संयोजनासाठी सहकार्य लाभले. पंच प्रमुख म्हणून नागराज हेळवार यांनी कामकाज पाहिले. १४, १७, १९ वर्षांखालील मुले व मुली या वयोगटांत स्पर्धा होणार आहेत.
मुलांच्या १७ वर्षांखालील अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. त्यामध्ये श्रीमती गेंदीबाई चोपडा विद्यालयाने फत्तेचंद जैन विद्यालयाचा ११-१० असा अवघ्या एका गुणाच्या फरकाने पराभव करत विजेतेपद खेचून आणले. विजेत्या संघाकडून आकाश चव्हाण, रोहित पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बलदोटा मेमोरियल स्कूलने राजर्षी शाहू महाराज विद्यालयावर ४-३ असा विजय मिळविला. तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य सामन्यात फत्तेचंद जैन विद्यालयाने बलदोटा मेमोरियल स्कूलला ६-४ असे हरविले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात गेंदीबाई चोपडा विद्यालयाने राजश्री शाहू महाराज विद्यालयाला ११- १० असे नमविले.


PNE24U50496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT