पिंपरी-चिंचवड

घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी शनिवारपासून ‘एक्स्पो’ ‘सकाळ’चा उपक्रम; ताथवडेतील सिल्व्हर बॅक्वेट हॉलमध्ये दोन दिवस आयोजन

CD

पिंपरी, ता. ३० ः स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, वेळेअभावी मनासारखे घर शोधणे शक्य होत नाही. त्यासाठी रजा घेणेही शक्य नसते. साप्ताहिक सुटीच्या दिवशी एक किंवा दोन प्रकल्पांनाच भेटी देऊन माहिती घेणे शक्य होते. त्यातील घर पसंत पडतेच असे नाही. याच अडचणी लक्षात घेऊन ‘सकाळ’ने शनिवारी (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) ताथवडे येथे ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे. तेही नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळावी, यासाठी. तेव्हा ‘एक्स्पो’ला भेट द्या आणि स्वप्नातील ‘वास्तू’ बुक करा!
घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, घरांच्या किमती पाहता, ‘घर घेणं शक्य नाही’ अशी भावना अनेकांची होऊ शकते. शिवाय, दैनंदिन कामाचे स्वरूप आणि सुट्ट्यांचा अभाव. यामुळे इच्छा असूनही वेळेअभावी अनेक ठिकाणी जाऊन घर पाहणे शक्य होत नाही. घर घेऊ इच्छिणाऱ्यांची हीच अडचण दूर करण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वप्नातील घरांच्या पूर्ततेसाठी ‘सकाळ’ने ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे. त्यामध्ये वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, गहुंजे, सोमाटणे, शिरगाव, हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील अनेक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अगदी वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतच्या सदनिकांची माहिती त्यात मिळेल. शिवाय, घरांच्या किमतीही बजेटमध्ये आहेत.
पिंपळे सौदागर, वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत परिसर झपाट्याने विकसित होत आहे. विविध गृहप्रकल्प इथे उभे राहिले आहेत. काहींचे काम सुरू आहे. पुढील वर्षी कदाचित घरांच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे आताच घर घेण्याची संधी मिळाली आहे. ती साधण्यासाठी आणि घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारची वेळ राखून ठेवा आणि ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देऊन स्वतःचं घर बुक करा!

‘वास्तू एक्स्पो’त काय?
- नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
- गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार
- अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध
- घर घेण्याचा निर्णय घेण्याची संधी मिळणार
- वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतची घरे

काय? कुठे? कधी? केव्हा?
काय ः सकाळ वास्तू एक्स्पो
कुठे ः सिल्‍व्हर बॅंक्वेट हॉल (कासा डी सिल्व्हर हॉटेल), औंध-रावेत बीआरटी रोड, डांगे चौकाजवळ, सिल्व्हर फिटनेस क्लबमागे, ताथवडे.
कधी ः ५ आणि ६ ऑक्टोबर
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग ः विनामूल्य
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७१८८४०

फोटो ः 50477

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT