पिंपरी-चिंचवड

ज्वेलर्स दुकानावर दरोड्याची तयारी; तिघांना अटक

CD

पिंपरी, ता. ८ : चिंचवडमधील सोनिगरा ज्वेलर्स या दुकानावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली.
सुनील मारुती लोणी (वय २२, रा. बिजलीनगर, नलावडे वस्ती, चिंचवड), समील मोहम्मद बागवान (वय २४, रा. शिवशक्ती कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड), काशिनाथ कल्याण उकली (वय २४, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह जोयबा बागवान (रा. दगडोबा चौक, चिंचवड), मयूर सुरवळे (रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचवड रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात एक टोळके थांबले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, चिंचवड पोलिसांनी रविवारी (ता. ७) दुपारी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडे दोन तलवार, एक चॉपर, एक कटावणी, मिरची पावडरची पुडी, नायलॉन रस्सी, पाच कापडी मास्क आढळून आले. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता हे आरोपी चापेकर चौकातील सोनिगरा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकणार असल्याचे समोर आले.


दोन दिवसांत तीन गुन्हे
या गुन्ह्यातील आरोपी सुनील मारुती लोणी याने दोन दिवसांत तीन गुन्हे केल्याचे समोर आले आहे. शनिवारी (ता. ६) सकाळी साडेदहा वाजता किराणा उधार न दिल्याच्या कारणावरून सुनील लोणी याने चिंचवडच्या बिजलीनगर येथील शिवनगरी येथे कोयत्याने दुकानात तोडफोड करत दुकानदार महिलेच्या हातावर कोयता मारला. तसेच धमकी देत शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवली. त्यानंतर, त्याच दिवशी साडेअकरा वाजता बळवंत चौक, बिजलीनगर येथे अनिकेत विजयकुमार मराठे (रा. बिजलीनगर, चिंचवड) यांची दुचाकी अडवून ‘गाडी दे नाही; तर तुला कापून टाकीन’ अशी भीती घालून फिर्यादीची दुचाकी घेऊन सुनील लोणी पसार झाला. त्यानंतर, रविवारी (ता. ७) दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lungi Ngidi Updates: डोक्याला मार लागल्याने अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलेल्या एनगिडीची कशी आहे प्रकृती? दिल्लीने दिले अपडेट्स

New Marathi Books : नव्या मराठी पुस्तकांची समृद्ध मेजवानी

Satara Protest: बुलडाणा आमदार संजय गायकवाड वादात; ‘शिवाजी कोण होता’ वाचनावरून साताऱ्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara Accident: दुर्दैवी घटना! रहिमतपूर येथे शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; गाळ काढताना घडला अपघात..

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

SCROLL FOR NEXT