पिंपरी-चिंचवड

नेवाळे वस्तीवरील कोंडी फुटण्यास होणार मदत

CD

चिखली, ता. ८ : ट्रान्सफॉर्मर आणि विजेचा खांब हलविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नेवाळे वस्ती येथे तास न तास होणारी वाहतूक कोंडी सोडण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
चिखली - आकुर्डी रस्त्यावरच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे रस्ता चिंचोळा झाला आहे. त्यातच चाकण, तळवडे आणि चिखली एमआयडीसी परिसरातून येणारी वाहने तसेच पिंपरी, चिंचवड, साने चौक आणि घरकुल या मार्गे चिखलीकडे जाणारी वाहने सकाळी आणि सायंकाळी एकाच वेळी जात असल्याने नेवाळे वस्ती येथे तास न तास वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सध्या महावितरणकडून रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर हलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु तूर्तास ट्रान्सफॉर्मर हलवल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी परिसरातील जागा मालकांनी सहकार्य केल्यास नागरिकांना वाहतूक कोंडीच्या विळख्यातून बाहेर पडणे शक्य होणार आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिखली येथे आले असता त्यांच्याकडे नेवाळे वस्ती, चिखली गावठाण येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत पवार यांनी महापालिका आयुक्तांशी बोलून चिखली परिसरातील समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. त्याला आता यश आले असून नेवाळे वस्ती येथील रस्त्यावर असलेला ट्रान्सफॉर्मर आणि विजेच्या खांब हलविल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
विकास साने, सामाजिक कार्यकर्ते, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT