पिंपरी-चिंचवड

राज्यातील बारा लाख मुली मोफत शिक्षणापासून वंचित

CD

पिंपरी, ता. ९ ः तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षणासह कृषी व्यावसायिकांच्या पदवी-पदविकांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती देण्यासाठीच्या निर्णयाचा शासन निर्णय ८ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, शासन निर्णय ७ ऑक्टोबर २०१७ मुळे पारंपारिकच्या कला, वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमांना वगळल्यामुळे राज्यातील १२ लाखांहून अधिक पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेमधून वगळले आहे.
अर्थसंकल्पात पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची घोषणा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पारंपारिक अभ्यासक्रमांना वगळले जात असल्याची चर्चा सुरू होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पदवी पर्यंतच्या मोफत शिक्षणाचे मूळ संकल्पना ही सर्व अभ्यासक्रमासाठी होती. तशी त्यांनी घोषणा केली होती. मात्र अर्थसंकल्प आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारंपारिक शिक्षणाचा मुद्दाच काही अधिकाऱ्यांनी अडवून धरला होता. या शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्ती मिळते, अशी चुकीची माहिती पसरवून हा विषयच रोखून धरला होता. यामुळे या अधिकाऱ्यांचे मनसुबे शासन निर्णय आल्यानंतर यशस्वी झाले असल्याचे दीपू फाउंडेशनचे संस्थापक अमर एकाड यांनी सांगितले.
जवळपास १५ लाख आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थी असताना केवळ १,५५,२६५ विद्यार्थ्यांना शासन निर्णय ७ ऑक्टोबर २०१७ नुसार शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून लाभ मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास १३ लाख विद्यार्थी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिले आहेत. शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहचत नसल्याने त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुलींना मोफत शिक्षण योजनेत पारंपारिक अभ्यासक्रमाचा समावेश करून तत्काळ सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकाड यांनी दिला आहे.

शाखा - विद्यार्थी
कला - ११,१५,३३०
कॉमर्स -८,९८,२७५
विज्ञान -५,८३,४८८
एकूण -२५,९७,०९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : मान्सून लांबणीवर, राज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT